Western Railway चा मोठा निर्णय! आता ट्रेनमधून अधिक वजनाचे सामान नेल्यास होणार कारवाई

60
Western Railway चा मोठा निर्णय! आता ट्रेनमधून अधिक वजनाचे सामान नेल्यास होणार कारवाई
Western Railway चा मोठा निर्णय! आता ट्रेनमधून अधिक वजनाचे सामान नेल्यास होणार कारवाई

अंत्योदय एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनसमध्ये (Western Railway) प्रवेश करताना झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १० प्रवासी जखमी झाले होते. यामुळे पश्चिम रेल्वेने सणासुदीच्या काळात मोठा निर्णय घेतला आहे. १००×१००×७० सेमीपेक्षा अधिक आकाराचे आणि ७५ किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान प्रवासी डब्यातून नेताना आढळल्यास प्रवाशांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. (Western Railway)

(हेही वाचा-ऐन सणासुदीच्या काळात Central Railway पुन्हा विस्कळीत!)

सणासुदीच्या दिवसात मोठ्या बॅगांसह प्रवासी प्रवास करतात. यामुळे रेल्वेडब्यांमध्ये तसेच फलाटावर प्रवासी ये-जा करण्यास अडचणी निर्माण होतात. एक्स्प्रेसमध्ये प्रवास करताना ५ ते १२ वर्षांच्या व्यक्तीला तिच्या वजनाच्या निम्या वजनाचे सामानासह प्रवास करण्याची मुभा आहे. (Western Railway)

अन्य प्रवाशांना रेल्वे डब्यांच्या श्रेणीनुसार ३५ ते ७० किलो सामान प्रवासी डब्यातून नेण्यास परवानगी असून यामध्ये १० ते १५ किलोपर्यंत सूट देण्यात येते. यापुढे स्कूटर, सायकल आणि अन्य सामानांससह १००×१००×७० सेमीपेक्षा मोठ्या आकाराच्या सामानावर वजनामध्ये देण्यात येणारी सूट ग्राह्य नसेल. (Western Railway)

(हेही वाचा-Konkan Railway वेळापत्रकात १ नोव्हेंबरपासून होणार ‘हे’ बदल!)

अधिक वजनाचे सामान आढल्यास त्यानुसार संबंधित प्रवाशांवर दंड आकारण्याच्या सूचना पश्चिम रेल्वेने संबंधितांना दिल्या आहेत. वांद्रे टर्मिनसमध्ये चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्यानंतर रेल्वे स्थानकातील गर्दी नियोजनासाठी पश्चिम रेल्वेकडून विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. हा त्याचाच एक भाग असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Western Railway)

हेही पहा-

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.