गॅस सिलिंडरच्या दरात १ सप्टेंबरपासून मोठी वाढ करण्यात आली आहे. गॅस सिलिंडरचे नवीन दर लागू होणार आहेत. आता व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ३९ रुपयांनी वाढली आहेत. आता १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून १ हजार ६९१ रुपयांना मिळणार आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. (LPG Gas Cylinder Price)
(हेही वाचा – Mumbai Alibaug Ferry Boat : तीन महिने बंद राहिलेली मांडवा – गेटवे जलवाहतूक पुन्हा सुरू)
घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही
जुलैमध्ये गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात झाली होती. जुलैमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल ३० रुपयांनी स्वस्त करण्यात आले होते. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळला होता. आता सप्टेंबरमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे.
देशभरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना धक्का बसला आहे. याचा फटका सर्वसामान्यांनाही बसणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांनी वाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसणार आहे. ही दरवाढ फक्त १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरामध्येच असणार आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. (LPG Gas Cylinder Price)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community