मोठी बातमी: घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत घसरण?

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात आता मोठे बदल करण्यात आल्याचे कळते आहे. मार्च महिन्याच्या एक तारखेपासून आता एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठे बदल करण्यात आले असल्याचे कळते आहे.

मार्च महिन्यापासून एलपीजी गॅस सिलिंडर म्हणजे घरगुती गॅस सिलिंडर हा स्वस्त होणार आहे. त्यामुळे ही गृहिणींसाठी आनंदाची बातमी असून यावेळी काहीसा दिलासा मिळणार आहे.

( हेही वाचा: Mumbai Local: खारकोपर स्थानकाजवळ लोकलचे तीन डबे घसरले )

सध्या LPG गॅसचे दर किती?

समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीत एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ही 1 हजार 53 रुपये इतकी आहे. ही किंमत 14.2 किलो गॅस सिलिंडरची आहे. तर मुंबईत 14.2 किलो एलपीजी गॅस (LPG Gas Price in Mumbai) सिलिंडरची किंमत 1 हजार 52 इतकी आहे. कोलकत्तामध्ये याच सिलिंडरची किंमत ही 1 हजार 79 इतकी असून चेन्नईमध्ये 1 हजार 68 इतकी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here