कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर, कोकण रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता सर्व मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकीट मिळणार आहे. याचाच अर्थ असा की तुम्ही रिझर्वेशन शिवाय ऐनवेळी तिकीट काढूनही प्रवास करु शकणार आहात. प्रवाशांसाठी हा मोठा निर्णय आहे.
रिझर्व्हेशनशिवाय ऐनवेळी तिकीट काढून प्रवास करण्याची सुविधा कोरोनाकाळात पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आता ती सुरू करण्यात आली आहे. हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा आहे. येत्या २९ जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे.
( हेही वाचा शिवसेनेच्या संकटकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीचा स्वार्थी कारभार! अध्यादेशांचा ‘पाऊस’ मुसळधार )
प्रवाशांना मोठा दिलासा
रेल्वेच्या सर्व मेल, एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांचे जनरल तिकीट आता सर्वत्र मिळणार आहे. यापूर्वी फक्त ठरावीक गाड्यांचे जनरल तिकीट मिळत होते. आता रेल्वेच्या एटीव्हीएम, जीटीबीएस, अनारक्षित तिकीट काऊंटर तसेच यूटीएस मोबाइल ॲपद्वारे जनरल तिकीट मिळणार आहे. त्यामुळे आता वेटिंग लिस्ट असलेल्या आणि ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community