रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! ‘या’ पदार्थांवरील सेवाशुल्क रद्द; जेवण स्वस्त होणार की महागणार?

रेल्वे मंत्रालयाने सर्व प्रवाशांना मोठा दिलासा देत सेवा शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु याचा प्रवाशांना फारसा फायदा होणार नसून रेल्वेने खाद्यपदार्थांच्या किमती वाढवल्या आहेत, म्हणजेच एकीकडे सेवा शुल्क रद्द करून दुसरीकडे पदार्थांचे दर वाढवण्यात आले ​​आहेत. रेल्वेने कॉफी, चहा, पाणी यावरील सेवा शुल्क रद्द केले आहे मात्र नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीच्या जेवणाच्या किंमतीत ५० रुपयांनी करण्यात आली आहे.

( हेही वाचा : गणपतीला कोकणात जाण्यासाठी आरक्षण करताय? सर्व विशेष गाड्यांची यादी वाचा एका क्लिकवर!)

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या पूर्वीच्या नियमांनुसार, एखाद्या प्रवाशाने राजधानी, दुरांतो किंवा शताब्दी सारख्या प्रीमियम ट्रेनमधून प्रवास केला आणि प्रवाशांनी रेल्वेच्या तिकिटासोबत जेवणाचा पर्याय निवडला नसेल तर प्रवासादरम्यान, चहा-कॉफीच्या २० रुपयांसोबत अतिरिक्त ५० रुपये भरावे लागायचे म्हणजेच एकूण ७० रुपये द्यावे लागत होते. परंतु आता वरील रेल्वेमधून प्रवास करताना प्रवाशांना चहा, कॉफी, पाणी यावरील अतिरिक्त ५० रुपये सेवा शुल्क भरावे लागणार नाही. चहा २० रुपयांनाच मिळेल. मात्र रेल्वे मंत्रालयाने जेवणावरील सेवाशुल्क रद्द केलेले नाही.

रेल्वेतील जेवणाचे नवे दर 

  • राजधानी, दुरांतो आणि शताब्दी सारख्या ट्रेनमध्ये, एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कारमधील प्रवाशांना ३५ रुपयांना चहा मिळेल आणि साध्या डब्यांमधील प्रवाशांना २० रुपयांना चहा मिळेल. तर नाश्ता, दुपारच्या व रात्रीच्या जेवणासाठी ९० ते २९५ रुपये शुल्क आकारले जाईल.
  • दुरांतो ट्रेनच्या स्लीपर कोचमधील प्रवाशांकडून चहासाठी १५ रुपये आकारले जातील. तर नाश्ता आणि जेवणासाठी ६५ ते १७० रुपये आकारले जातील.
  • तेजस ट्रेनमध्ये चहा मिळणार नाही. पण नाश्ता आणि जेवणासाठी १०५ ते २९५ रुपये मोजावे लागणार आहेत.
  • वंदे भारतमध्ये प्रवाशांना १५ रुपयांत चहा मिळेल. तर नाश्ता आणि जेवणासाठी ६६ ते २९४ रुपये मोजावे लागणार आहेत.
  • ट्रेन लेट झाल्यास ८ रुपयांत चहा-पाणी दिले जाईल. तर नाश्ता आणि दुपारच्या जेवणासाठी ३० रुपये आकारले जातील.

( हे नवे नियम फक्त राजधानी, दुरांतो, शताब्दी, तेजस यांसारख्या प्रीमियम गाड्यांना लागू असतील )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here