रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. 6 जून म्हणजे आज भारतीय रेल्वेकडून 198 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणा-यांनी वेळापत्रक पाहूनच बाहेर निघावे. 198 ट्रेन रद्द तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने रद्द झालेल्या गाड्यांची यादी जारी केली आहे.
या गाड्या रद्द
भारतीय रेल्वेने 6 जूनला 198 रेल्वे रद्द केल्या आहेत. याशिवाय 12 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. शिवाय 10 गाड्या दुस-या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
का रद्द केल्या जातात गाड्या?
अनेक वेगवेगळ्या झोनमध्ये सुरु असलेली दुरुस्ती आणि इतर कारणांमुळे या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही वेळेस खराब वातावरण असल्यास, गाड्या रद्द केल्या जातात. पाऊस, वादळ यांसारख्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द होतात. त्याचबरोबर अनेक वेळा कायदा आणि सुव्यवस्थेमुळे गाड्या रद्द केल्या जातात किंवा त्यांच्या वेळा बदलल्या जातात.
( हेही वाचा: Mobile recharge देणार मोठा दणका; Airtel, Jio, VI, Idea कंपन्यांचे असे असतील नवे दर )
अशी पाहा रद्द झालेल्या गाड्यांची यादी
- रद्द केलेल्या गाड्यांची यादी तपासण्यासाठी, तुम्ही प्रथम अधिकृत वेबसाइट https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ वर जाऊन तपासू शकता.
- त्यानंतर Exceptional Trains या पर्यायावर क्लिक करा
- आता येथे तुम्हाला रद्द, पुनर्निर्धारित आणि वळवलेल्या गाड्यांच्या यादीवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर, तुम्हाला येथे एक संपूर्ण यादी दिसेल, यामध्ये तुम्ही तुमच्या ट्रेनचा नंबर तपासू शकता.