मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणा-या महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेने आपल्या सर्व नाॅन-एसी नियमित लोकल ट्रेनमध्ये अतिरिक्त महिला कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचे जनरल कंपार्टमेंट अद्ययावत केले जातील. सध्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिला वर्गासाठी आणखी 25 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. 8 ऑक्टोबर 2022 पासून ही सुविधा लागू करण्यात आली आहे.
महिला प्रवाशांची मागणी
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले, महिला प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आम्ही एका अतिरिक्त महिला कोचची तरतूद केली आहे. याशिवाय या डब्यात एक महिला द्वितीय श्रेणीच्या आणखी 25 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. हा कोच लेडीज कोचला लागून आहे. ते म्हणाले की ही सुविधा 8 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने उपनगरीय लोकल गाड्यांच्या द्वितीय श्रेणीतील महिलांसाठी 25 अतिरिक्त आसनांची तरतूद केली आहे. चर्चगेटच्या टोकापासून 11 व्या कोचमध्ये आणि विरारच्या टोकापर्यंत द्वितीय श्रेणीतील कोचमध्ये सध्याच्या डब्याव्यतिरिक्त अतिरिक्त कोचची तरतूद करण्यात आली आहे.
( हेही वाचा: आता महाविद्यालयेच ठरवणार अभ्यासक्रम; UGCची सुधारित नियमांना मंजुरी )
महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेवर महिला तिकीटधारकांची टक्केवारी 24.38 टक्के वरुन 24.6 टक्के झाली आहे. 2019 मध्ये, पश्चिम रेल्वेने बदलत्या काळाच्या अनुषंगाने आपले महिला डबे अपडेट केले. तेव्हा महिला प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने डब्याचे आधुनिकीकरण केले होते.
Join Our WhatsApp Community