Railway Ticket : आता 120 दिवस नाही, तर ‘इतके दिवस’ आधीच होणार रेल्वे आरक्षण 

30
Railway Ticket : आता 120 दिवस नाही, तर 'इतके दिवस' आधीच होणार रेल्वे आरक्षण 
Railway Ticket : आता 120 दिवस नाही, तर 'इतके दिवस' आधीच होणार रेल्वे आरक्षण 

दिवाळीपूर्वी रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेने नियमात मोठा बदल केला आहे. गुरुवारी 17 ऑक्टोबर रोजी महत्त्वाचा निर्णय घेत रेल्वेने आगाऊ तिकीट बुक करण्याची मुदत कमी केली आहे. 1 नोव्हेंबरपासून प्रवाशांना आता 120 दिवसांऐवजी 60 दिवस आधीच तिकीट बुक करता येणार आहे. मात्र, ३१ ऑक्टोबरपर्यंत तिकीट बुकिंगमध्ये कोणताही बदल होणार नाही. (Railway Ticket)

नवीन नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार 

रेल्वेने गुरुवारी सांगितले की 1 नोव्हेंबर 2024 पासून प्रवासी त्यांच्या प्रवासाच्या 60 दिवस आधी आगाऊ तिकीट बुक करू शकतील. पूर्वीप्रमाणे 120 दिवस अगोदर आगाऊ आरक्षण करता येणार नाही.  

या गाड्यांमध्ये हा नियम लागू होणार नाही

ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस अशा काही विशेष गाड्यांवर हा नियम लागू होणार नाही. या गाड्यांच्या बुकिंग नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही. त्याचबरोबर विदेशी पर्यटकांसाठी 365 दिवसांची मुदतही बदलली जाणार नाही, म्हणजे परदेशी पर्यटकांच्या आगाऊ बुकिंगवर कोणताही परिणाम होणार नाही.

(हेही वाचा – किरीट सोमय्यांनी मतदानाची आकडेवारी देत सिद्ध केला Vote Jihad)

टिकीटाच्या काळ्या बाजाराला आळा घालणार

रेल्वेने सांगितले की, केवळ 13 टक्के लोकच 120 दिवस अगोदर ट्रेनचे बुकिंग करतात. बहुतेक लोक ४५ दिवसांच्या आत तिकीट आधीच बुक करतात. याशिवाय आतापर्यंत आगाऊ तिकीट बुक (Advance ticket Book) केल्यामुळे रद्द करणे आणि पैसे परत करण्याची समस्या आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे तिकिटांच्या काळाबाजाराला आळा बसणार असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.