पंजाब सीमेवर BSF जवानांची मोठी कामगिरी; पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान

43
पंजाब सीमेवर BSF जवानांची मोठी कामगिरी; पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान

पंजाबच्या पठाणकोट येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर (एलओसी) सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारले आहे. पठाणकोट मार्गे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना जवानांनी त्याला इशारा दिला, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष करून तो पुढे जात राहिला. धोका ओळखून बीएसएफ जवानांनी घुसखोराला ठार मारले.

(हेही वाचा – Veer Savarkar : “देश त्यांची तपस्या, त्याग आणि धाडस विसरू शकत नाही…” ; स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून अभिवादन)

यासंदर्भातील माहितीनुसार बुधवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी ताशपाटन सीमा चौकीवरील जवानांना (BSF) सीमेपलीकडे संशयास्पद हालचाली दिसल्या. एकजण भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. सतर्क सैनिकांनी त्याला इशारा दिला, पण त्याने लक्ष दिले नाही.

(हेही वाचा – Weather Update : राज्यात 6 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट; उत्तर-दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता)

तो पुढे जात राहिल्याने बीएसएफ (BSF) जवानांनी त्या घुसखोराला ठार मारले. घुसखोराची ओळख आणि हेतू शोधला जात असून सतर्क बीएसएफ जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.