Crop Insurance : राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई मिळणार

55
Crop Insurance : राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई मिळणार
  • प्रतिनिधी

राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार, त्यांच्या बँक खात्यात थेट २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून २८५२ कोटी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. (Crop Insurance)

(हेही वाचा – इचलकरंजीत क्रीडा संकुल उभारणार; उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची घोषणा)

विमा नुकसान भरपाईची थेट खात्यात मदत

या निर्णयामुळे मागील काही हंगामांतील प्रलंबित विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. या प्रक्रियेस गती देण्यासाठी विमा कंपन्यांना तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषीमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी सांगितले. (Crop Insurance)

(हेही वाचा – Kunal Kamra ला दहशतवादी संघटनांकडून पैसे ? राहुल कनाल यांचे गंभीर आरोप)

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विमा नुकसान भरपाईचे वितरण खालीलप्रमाणे असेल :
  • खरीप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ – ₹२.८७ कोटी
  • खरीप २०२३ – ₹१८१ कोटी
  • रब्बी २०२३-२४ – ₹६३.१४ कोटी
  • खरीप २०२४ – ₹२३०८ कोटी

(हेही वाचा – IPL Cricket Betting Case : आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर बेटिंग प्रकरणी पिंपरी पोलिसांची कारवाई !)

शासनाचा तातडीने अंमलबजावणीचा निर्धार

शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असून, ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांना शेतीसाठी नवीन आर्थिक आधार निर्माण होईल. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शासनाच्या या पावलामुळे शेती क्षेत्राला बळकटी मिळेल, असे कृषीमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी स्पष्ट केले. (Crop Insurance)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.