कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ

सौदी अरेबियाने जुलैसाठी कच्च्या तेलाच्या किमती वाढवल्यामुळे सोमवारी वायदे बाजारात तेलाचा प्रतिपिंप दर उच्चांकी 120 डाॅलरवर पोहोचला. भारतीय चलनानुसार कच्च्या तेलाच्या दरात 29 रुपयांनी वाढ झाल्याने, प्रतिपिंप दर 9 हजार 264 रुपये झाला. खरेदीदारांच्या बोलींमुळे वायदे बाजारात कच्च्या तेलाचा भाव वधारल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

ओपेक प्लस या तेल उत्पादक देशांच्या संघटनेने गेल्या आठवड्यात तेल उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतला असला तरी तेलाच्या पुरवठ्याबाबत शंका आहे.

( हेही वाचा: प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमध्ये हवेत हे ५ अ‍ॅप्स! झटपट होतील सरकारी कामे )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here