NEET-UG 2022 परीक्षेत घोटाळा! कोचिंग क्लासेसचा समावेश असल्याची शक्यता

वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्वाची असणारी NEET-UG 2022 प्रवेश परीक्षा नुकतीच घेण्यात आली. या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. देशातील सर्वोत्तम मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी जागा विकल्या गेल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. देशातील चार राज्यांमध्ये हे जाळे पसरल्याचे सांगण्यात येत आहे.

देशातील टॉप कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET-UG परीक्षा देण्यासाठी 20-20 लाख रुपये देण्यात आल्याचे सीबीआयच्या चौकशीत समोर आले आहे. महाराष्ट्र,बिहार,उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये या परीक्षेतील घोटाळेबाजांचे जाळे पसरले असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः सर्वसामान्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, ‘या’ पदार्थांवर लागणार नाही जीएसटी)

कोचिंग क्लासेसचा समावेश

पेपर सोडवणा-या विद्यार्थ्यांनी परीक्षार्थींकडून मोठी रक्कम घेत त्या बदल्यात उत्तरपत्रिका लिहिल्या आहेत. या फसवणुकीबाबत सीबीआयने सोमवारी आठ जणांना अटक केली आहे. मुख्य म्हणजे यामध्ये देशातील टॉप कोचिंग इन्स्टिट्यूटस् ची नावे समोर येत आहेत.

मॉर्फ केलेल्या फोटोंचा वापर

फसवणूक करणा-या या टोळीने परीक्षा हॉलमध्ये डमी उमेदवारांना प्रवेश मिळावा म्हणून मॉर्फ केलेले फोटो ओळखपत्रात लावण्यात आले होते, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा खोलवर तपास करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या परीक्षांसाठी कडक तपासणी करुन सुद्धा हे प्रकार घडले असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

(हेही वाचाः EPFO: PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, पीएफवरील व्याज वाढवण्यावर होणार निर्णय)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here