पालघरच्या झिका व्हायरसच्या रुग्णाबाबत आली मोठी अपडेट

गेल्या महिन्यात पालघरमध्ये झिका व्हायरच्या राज्यातील पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती. पालघरमधील झाई येथील आश्रम शाळेतील सात वर्षांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्यानंतर आरोग्य विभागाने वैद्यकीय पथकांचा मोर्चा पालघरमध्ये वळवला होता. ही सात वर्षांची मुलगी आता बरी झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या मुलीला झिका व्हायरची गंभीर लक्षणे नव्हती. केवळ दोन दिवसांच्या तापानंतर तपासणीअंती मुलीला झिका व्हायरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. झिका व्हायरच्या१०० पैकी ८० रुग्णांमध्ये कोणतीच लक्षणे आढळून येत नाहीत. त्यांना उपचारांचीही गरज भासत नाही. सात वर्षांच्या मुलीचीही केस अशीच होती. तिच्या प्रकृतीत सुधारणाही दिसून आली, असेही आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली. मात्र डेंग्यू आणि मलेरियाची रुग्णसंख्या या भागात मोठ्या प्रमाणात आहे.

( हेही वाचा : नायगाव ‘बीडीडी’मधील २०६ गाळेधारकांची पुनर्वसित इमारतींमध्ये सदनिका निश्चिती)

डेंग्यू हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचा प्रसार एडिस एजिप्टाय प्रकारातील मादीमार्फत होतो. पालघरमध्ये सध्या डेंग्यूच्या आजाराचा उद्रेक झाला आहे.याआधी १४ जुलैपर्यंत पालघरमध्ये डेंग्यूचे ५३ रुग्ण आढळले होते. ३० जुलैपर्यंत पालघरमध्ये १८५ रुग्ण आढळल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली. तर चिकनगुनियाच्या ६१ रुग्णांचीही नोंद झाली आहे.

डेंग्यूविषयी –

डेंग्यू हा एडिस एजिप्टाय डासामुळे होणारा गंभीर विषाणूजन्य आजार आहे.

डेंग्यूची लक्षणे –

सतत तीव्र ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, डोळयांच्यामागे दुखणे, भूक मंदावणे, मळमळणे, पोटदुखी, त्वचेवर पुरळ येणे तसेच नाक, हिरड्या व गुदद्वारातून रक्तस्त्राव

निदान व उपचार

 • रक्तजल चाचणीतून डेंग्यूचे निदान होते. डेंग्यूवर निश्चित औषधोपचार नाहीत. रुग्णांना अॅस्प्रिन, वेदनाशामक आणि
 • प्रतिबंधक औषधे देऊ नयेत.
 • डेंग्यू तापाची तीव्र लक्षणे आढळल्यास त्या रुग्णआला संपूर्ण विश्रांती द्यावी
 • रुग्णाच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी तापाच्या आजारावर औषधे द्यावीत.
 • रुग्णाला फळांचा रस तसेच ओ.आर.एस.चे द्रावण द्यावे
 • वैद्यकीय आवश्यकतेनुसार रक्त संक्रमण

प्रतिबंधात्मक उपाय

 • आठवड्यातून एकदा किमान घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावीत
 • पाणी साठवलेल्या सर्व भांड्यांना योग्य पद्धतीने झाकण लावावे
 • घराभोवती जागा स्वच्छ आणि कोरडी करावी
 • घरांच्या भोवताली व छतावर वापरात नसलेले टाकाऊ साहित्य ठेऊ नये

चिकनगुनियाविषयी…

चिकनगुनियास विषाणूचा प्रसार एडिस एजिप्टाय या डासांपासून होतो. ही डासांची मादी चिकनगुनिया आजारी रुग्णाचे रक्त शोषून बाधित करते.

लक्षणे –

 • ताप, डोकेदुखी, उलटी, मळमळ, अंगावर चट्टे उमटणे व सांध्यातून हाडे वळणे इत्यादी आहेत.
 • हुडहुडी भरणे, डोके दुखणे, ओकारी होणे, अंगावर पुरळ उमटणे
 • या आजारात वाक येणे किंवा कमरेतून वाकलेला रुग्ण ही लक्षणे सहज आढळतात.
 • सतत जाणवणारी सांधेदुखी थकवणारी असते. कित्येकदा दीर्घ उपचारांची गरज भासते.
 • डास चावल्यानंतर ३ ते ७ दिवसांनी लक्षणे दिसून येतात.

उपचारपद्धती –

चिकनगुनियावर विशिष्ठ उपचारपद्धती उपलब्ध नाही. या आजारातील लक्षणांनुसार उपचार केल्यास व वेदनाशमक औषध घेतल्यास भरपूर आराम केल्यास फायदा होतो.

प्रतिबंधात्मक उपाय

 • घरातील पाणी साठवण्याची सर्व भांडी आठवड्यातून एकदा स्वच्छ पाण्यातून घासा
 • पाणी साठवण्याची सर्व भांडी योग्य पद्धतीने झाकून ठेवा
 • घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा
 • शक्यतो पूर्ण अंग झाकेल असे कपडे परिधान करा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here