Bullet Train संबंधी मोठी अपडेट; आता बाजूने गेली, तरी ट्रेनचा आवाज येणार नाही

64
मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांना जोडणाऱ्या 508 किमीच्या मार्गाच्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा 100 किमीचा वायडक्ट बांधून पूर्ण झाला आहे. बुलेट ट्रेन दर ताशी 320 किमी वेगाने धावणाऱ्या या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर दोन तासांत कापता येणार आहे. मात्र, बुलेट ट्रेनचा (Bullet train) वेग जास्त असल्याने ध्वनी प्रदुषण होऊ नये यासाठी या मार्गावर नॉईज बॅरियर (Bullet train noise barrier) बसविण्यात येत आहेत. आतापर्यंत 100 किमी वायडक्ट मार्गावर (उन्नत मार्ग) 200,000 नॉईज बॅरियर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
(हेही वाचा – Bangladesh Crisis : शेख हसीनांना परत पाठवण्याची बांगलादेशची भारताकडे मागणी)
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या (Mumbai-Ahmedabad bullet train) बीकेसी येथील भूमिगत स्थानकासह समुद्राखालील बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. वर्ष २०२५ मध्ये बिलीमोरा ते वापी दरम्यान बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा (Bullet Train First phase Bilimora to Vapi) सुरू होणार आहे. दरम्यान हे ध्वनी अडथळे मार्गाच्या दोन्ही बाजूंना लावण्यात येत आहेत. दरताशी ३२० किमी वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनचा (Bullet train) होणारा आवाज कमी करण्यासाठी ते बसवले जात आहेत. नॉइज बॅरियर्स रुळापासून २ मीटर उंच आणि १ मीटर रुंद काँक्रीट पॅनेल बसविले आहेत. प्रत्येक नॉईज बॅरियर्स हा अंदाजे ८३०-८४० किलो वजनाचा आहे. हे ट्रेनद्वारे निर्माण होणारा ध्वनी आणि ट्रेनच्या खालच्या भागातून निर्माण होणारा आवाज, मुख्यतः रुळांवर धावणाऱ्या चाकांच्या घर्षणातून होणारा आवाज रोखण्यास मदत होईल.

(हेही वाचा – BMC : महापालिकेचे सहआयुक्त चंद्रशेखर चौरे आणि उपायुक्त चव्हाण सेवानिवृत्तीनंतर बनणार विशेष कार्य अधिकारी)

बीकेसी भूयारी स्थानक आणि समुद्री बोगदा

मुंबईतील बीकेसी येथे बुलेट ट्रेनच्या भूयारी स्थानकासाठी पहिला काँक्रीट बेस-स्लॅब 32 मीटर खोलवर यशस्वीपणे टाकण्याचे काम झाले आहे. याची उंची दहा मजली इमारती इतकी खोल आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांबीच्या समुद्री बोगद्याचे काम सुरु आहे. मुख्य बोगद्याच्या निर्मितीकरीता सोय होण्यासाठी 394 मीटर लांबीचा इंटरमीडिएट बोगदा (ADIT) खणण्याचे काम पूर्ण झाले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.