बिहारमधील अररिया जिल्ह्यात बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी मोजण्यात आली आहे.
( हेही वाचा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कधी घालणार सरकारच्या तिजोरीत हात! महापालिकेच्या पत्रांना केराची टोपली)
भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) सांगितले की, बुधवारी पहाटे 5.35 वाजता बिहारच्या अररियामध्ये 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता. याशिवाय, बुधवारी पहाटे पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे अशाच तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. सिलीगुडीच्या दक्षिण-पश्चिमेला 140 किमी अंतरावर झालेल्या भूकंपाचे धक्के प्रथम राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनसीएस) नोंदवले आहेत. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे 5:35 वाजता भूकंप झाला. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही.
Join Our WhatsApp Community