आता पाठ्यपुस्तकातूनही होतोय ख्रिस्ती धर्मप्रसार!

बिहार शिक्षण मंडळाच्या स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगच्या इयत्ता ५वीच्या ब्लॉसम पार्ट-४ या क्रमिक पुस्तकात मुलांच्या मनावर येशू ख्रिस्ताचा प्रभाव पडेल अशा आशयाचा धडा देण्यात आला आहे. 

पाठ्यपुस्तकांतून चुकीच्या इतिहासाचे उदात्तीकरण केले जाते, त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंडळ असो किंवा देशांतर्गत राज्य शिक्षण मंडळे असो, त्यात ते कायम सुधारणा करत असतात, अशीच सुधारणा आता बिहार शिक्षण मंडळाला करावी लागणार आहे. कारण या राज्याच्या अभ्यासक्रमामध्ये ५वी इयत्तेच्या पुस्तकातील धड्यामधून लहान मुलांवर येशु ख्रिस्ताचा प्रभाव पडेल, अशा आशयाचा धडा देण्यात आला आहे. यावर सध्या सोशल मीडियातून जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

५वी इयत्तेच्या मुलांवर येशू ख्रिस्ताचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न!

एका बाजूला राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण मंडळे क्रमिक अभ्यासक्रमात सुधारणा करू लागले आहेत. मात्र दुसरीकडे राज्य पातळीवरील शिक्षण मंडळांनाही सुधारणा करावा लागणार आहे. बिहार येथील शिक्षण मंडळाच्या स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग यांच्या इयत्ता ५वीच्या ब्लॉसम पार्ट-४ या क्रमिक पुस्तकात चक्क पाचवीच्या मुलांच्या मनावर येशू ख्रिस्ताचा प्रभाव पडेल अशा आशयाचा धडा देण्यात आला आहे. ‘जिझस टू सुपर’ या मथळ्याखालील हा धडा आहे. ज्यामध्ये एक कुटुंब येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी कसे आतुर असतात, येशूचे कृपाछत्र मिळावे याकरता त्यांचा प्रयत्न कसा असतो, अशी काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे. अशा येथील क्रमिक पुस्तकातून ख्रिस्ती धर्मप्रसार होत आहे. त्याला रोखणे गरजेचे आहे.

(हेही वाचा : बारावीचा फुगलेला निकाल! ५०-६० हजार विद्यार्थी प्रवेशापासून राहणार वंचित?)

बिहार शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमात बदल करण्याची मागणी!   

मागील अनेक दशकांपासून केंद्रीय शिक्षण मंडळ असो अथवा राज्यनिहाय शिक्षण मंडळे असो, त्यातील पाठ्यक्रम अभ्यासक्रमातून चुकीचा इतिहास शिकवला जातो, अथवा राष्ट्रपुरुष, महापुरुष यांचा अवमान होणारे शिक्षण दिले जात होते. मात्र त्यामध्ये सुधारणा होत आहे. अशाच प्रकारे विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच महाविद्यालयांमध्ये शिकवण्यात येणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघल आणि परकीय आक्रमकांचे उदात्तीकरण केले जात होते, तो इतिहास काढून त्या जागी भारतातील पराक्रमी राजांचा इतिहास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच प्रमाणे एनसीईआरटीनेदेखील अभ्यासक्रमात सुधारणा करत इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विस्तृत स्वरूपात दिला. तसेच उत्तर प्रदेश शिक्षण मंडळाने त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकात राणी लक्ष्मीबाई यांच्या अवमानकारक मजकूर होता, तो वगळण्यात आला. त्याप्रमाणे आता बिहार शिक्षण मंडळानेही त्यांच्या क्रमिक पुस्तकातून ख्रिस्ती धर्माचा प्रसार थांबवण्याची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here