ठाणे परिसरातील घोडबंदर रोड वरील कासारवडवली या ठिकाणी बिकानेर स्वीट्स मिठाई शॉप ची अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यामार्फत अचानक तपासणी करण्यात आली. या मिठाईच्या दुकानात विनापरवाना विविध प्रकारच्या मिठाई व फरसाण इत्यादी अन्न पदार्थाचे उत्पादन करीत असल्याने एफडीएच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. अन्नपदार्थाच्या विक्रीसाठी उत्पादन करताना कोणतीही व खबरदारी घेत नसल्याचे आढळून आल्याने सर्व निकष पूर्ण होईपर्यंत दुकान बंद करण्याचे आदेश एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिले. नियमबाह्य मिठाईची विक्री केल्याने एफडीएने दोन लाखांचा दंडही मालकावर ठोठावला.
(हेही वाचा – CAG Report : आयुष्मान भारत योजनेत घोटाळा; एका मोबाईल क्रमाकांशी 7.50 लाख लोक लिंक)
एफडीएच्या अधिकाऱ्यांची निरीक्षणे –
- बिकानेर स्वीट्सने अन्न पदार्थ तयार करण्याकरिता वापरलेले जाणारे पाणी पिण्यायोग्य असल्याबाबतचा अभिलेखा एफडीएच्या अधिकाऱ्यांना सादर केलेला नाही.
- अन्न पदार्थ हाताळणारे कामगार संसर्गजन्य, त्वचारोग आणि किंवा तत्सम रोग यापासून मुक्त आहेत, याबाबतची वैद्यकीय तपासणी केलेली नाही.
- उत्पादन प्रक्रियेवर पर्यवेक्षण ठेवण्यासाठी शैक्षणिक पात्रता असलेल्या व्यक्तीची ‘पर्यवेक्षक’ म्हणून नेमणूक केलेली नाही.
- अन्नपदार्थाची खरेदी बिले नाहीत.
- मिठाई विक्री करताना पॅकबंद न केलेल्या, सुट्ट्या किंवा खुल्या स्वरुपात विक्री करण्याकिरता ठेवलेल्या मिठाईच्या कंटेनर किंवा ट्रेवर एक्सपायरी तारीख नमूद केलेली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community