Bilkis Bano Case : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरोपींनी उचलले मोठे पाऊल

Bilkis Bano Case : फेब्रुवारी 2002 मध्ये गोध्रा रेल्वे हत्याकांडानंतर (Godhra Railway Massacre) बिल्किस बानोवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता. सर्व 11 दोषींनी रविवारी रात्री उशिरा तुरुंग अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले.

230
Bilkis Bano Case : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरोपींनी उचलले मोठे पाऊल
Bilkis Bano Case : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आरोपींनी उचलले मोठे पाऊल

बिलकिस बानो प्रकरणातील आरोपींची शिक्षा माफ करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. (Bilkis Bano Case) त्यानंतर त्यांना 21 जानेवारीपर्यंत तुरुंगात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानंतर सर्व 11 आरोपी रात्री 11:30 वाजता सिंगवाड रणधिकपूर येथून दोन खासगी वाहनांमध्ये गोध्रा उपजिल्हा कारागृहात (Godhra Jail) पोहोचले आणि त्यांनी आत्मसमर्पण केले.

(हेही वाचा – Ram Mandir – विकसित भारताचा सुवर्णसोपान)

सर्वोच्च न्यायालयाने दिले होते आदेश

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक एन. एल. देसाई यांनी पीटीआयला सांगितले की, ”सर्व 11 दोषींनी रविवारी रात्री उशिरा तुरुंग अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले.”

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 8 जानेवारी रोजी गुजरात सरकारने (Gujarat Govt) हाय-प्रोफाईल प्रकरणातील 11 दोषींना दिलेली माफी रद्द केली होती. 2022 मध्ये मुदतपूर्व सुटका झालेल्या दोषींना न्यायालयाने दोन आठवड्यांत पुन्हा तुरुंगात जाण्याचे आदेश दिले होते.

(हेही वाचा – Ayodhya Rammandir : आज अयोध्या सजली…; रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची सिद्धता पूर्ण)

दोषींना अधिक वेळ नाहीच

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दोषींना अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली होती आणि त्यांना रविवारी आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. बकाभाई वोहानिया, बिपिनचंद्र जोशी, केसरभाई वोहानिया, गोविंद नाई, जसवंत नाई, मितेश भट्ट, प्रदीप मोरढिया, राधे श्याम शाह, राजूभाई सोनी, रमेश चंदना आणि शैलेश भट्ट अशी या 11 दोषींची नावे आहेत.

फेब्रुवारी 2002 मध्ये गोध्रा रेल्वे हत्याकांडानंतर (Godhra Railway Massacre) बिल्किस बानोवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता. (Bilkis Bano Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.