-
ऋजुता लुकतुके
एकेकाळी जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेले मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी आणखी एकदा आपल्यातील सह्रदयतेचं दर्शन घडवलं आहे. यापूर्वी ते जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असताना त्यांनी मोठी रक्कम आपल्या फाऊंडेशनला दान केली होती. त्यामुळे त्याचा श्रीमंतांच्या यादीत पहिला क्रमांकही धोक्यात आला होता. पण, तरीही त्यांनी दानधर्म सोडला नाही. आताही वयाच्या ६९व्या वर्षी त्यांनी आपली ९९ टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आपल्या तीन मुलांसाठी ते १ टक्का संपत्ती ठेवणार आहेत.
(हेही वाचा – रायगडावरील सभेत खासदार उदयनराजे यांनी Amit Shah यांच्याकडे केल्या ‘या’ मागण्या)
पण, या १ टक्का संपत्तीनंतरही त्यांची मुलं अब्जाधीश होतील. बिल गेट्स (Bill Gates) आणि मेलिंडा गेट्स यांनी २०२१ मध्ये २७ वर्षांचा संसार केल्यानंतर घटस्फोट घेतला होता. दोघे त्यावेळी वेगळे झाले होते. दोघांना तीन मुलं आहेत. यामध्ये मुलगी जेनिफर कॅथरीन गेट्स २८ वर्षांची, रोरी जॉन गेट्स २७ आणि फिबी एडेल गेट्स २२ वर्षांची आहे. मुलांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी. आणि बिट गेट्स यांचं वजन कुठेही वापरू नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तीनही मुलांना मिळून ते १ टक्के संपत्ती मागे ठेवणार आहेत.
(हेही वाचा – मुस्लिम तरुणीसोबत उद्यानात बसल्याने Hindu तरुणाला मारहाण; मात्र काँग्रेस नेत्याने घेतली अजब भूमिका)
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे दीर्घकाळ जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले आहेत. रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती १६२ अब्ज अमेरिेकन डॉलर इतकी आहे. म्हणजेच भारतात १३,९०० अब्ज रुपयांचे ते मालक आहेत. गेट्स (Bill Gates) यांनीया पूर्वीच मानवी कल्याणासाठी त्यांच्या फाऊंडेशनद्वारे मोठा खर्च केला आहे. इथून पुढे ते फाऊंडेशनच्या कामावर लक्ष केंद्रीत करणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community