Billionaire Boss : अब्जाधीश मालकांना नोकरदार माणसाचा ‘हा’ स्वभाव अजिबात आवडत नाही!

Billionaire Boss : अमेरिकन उद्योजक टॉड ग्रेव्ह्ज यांनी उमेदवाराची नियुक्ती करतानाचे काही निकष सांगितले आहेत. 

60
Billionaire Boss : अब्जाधीश मालकांना नोकरदार माणसाचा 'हा' स्वभाव अजिबात आवडत नाही!
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकेतील ५२ वर्षीय अब्जाधीश उद्योगपती आणि रेझिंग केन्सचे मालक टॉड ग्रेव्ह्ज अलीकडे शार्क टँक अमेरिका कार्यक्रमात आले होते. तिथे त्यांनी आपल्याला नोकर वर्गातील आवडते गुण तर सांगितलेच आणि त्याचबरोबर असाही एक गुण सांगितला, जो त्यांना अजिबात आवडत नाही. वयाच्या ३० व्या वर्षी आठवड्यातील ९० तास काम करत त्यांनी रेझिंग केन्सचं साम्राज्य उभं केलं आहे आणि ते सध्या ९.५ अब्ज अमेरिकन डॉलरचे मालक आहेत. (Billionaire Boss)

रेझिंग केन्स या त्यांच्या हॉटेल चेनची सध्या ८०० च्या वर आऊटलेट्स आहेत. ते स्वत: उमेदवारांसाठी मुलाखती घेतात. आणि योग्य उमेदवार निवडतानाचा त्यांचा पहिला निकष आहे कामाप्रती प्रेम. तसंच जे उमेदवार दर २-३ वर्षांत नोकरी बदलतात त्यांचा ते विचारही करत नाहीत. (Billionaire Boss)

(हेही वाचा – Ind Vs NZ Test Series : भारतीय फलंदाज डावखुऱ्या फिरकीच्या जाळ्यात कसे अडकले?)

‘तुझी इथं किती वर्षं राहण्याची तयारी आहे, हा प्रश्न मी पहिला विचारतो. कारण, २-३ वर्षं नोकरी करणारा उमेदवार हा कंपनीसाठी नाही तर स्वत:साठी काम करत असतो, असं माझं ठाम मत आहे आणि असे उमेदवार मला नको आहेत. कारण, मी तसं केलं असतं तर इतकं दूरवर पोहोचलो नसतो. मी सगळ्यांचा एकत्रपणे विचार केला. अशी माणसं उत्तरं देतानाही प्रामाणिक नसतात. मुलाखत घेणाऱ्यांना जे ऐकायचंय अशी उत्तरं ते देतात,’ असं ग्रेव्ह्ज यांनी सांगितलं. (Billionaire Boss)

‘जे उमेदवार आपल्याबरोबरच आपल्या शेजारच्यांची काळजी करतात, त्यांची विचारपूस करतात, असे लोक कंपनीला पुढे घेऊन जातात. अगदी हॉटेलमधील शेफ असो की, लेखापाल सगळे समुहात काम करण्यासाठी योग्य असे उमेदवार असावेत असा माझा कटाक्ष असतो, असं शेवटी ग्रेव्ह्ज म्हणाले. (Billionaire Boss)

(हेही वाचा – Panvel Railway Station : पनवेल रेल्वेस्थानकाचा रोमांचक इतिहास)

ग्रेव्ह्ज यांनी विद्यार्थी दशेत एका तेल शुद्धीकरण प्रकल्पात आठवड्याचे ९० तास काम केलं आहे. त्यातून वाचलेल्या पैशातून त्यांनी रेझिंग केन्स हे हॉटेल सुरू केलं. लुईझियाना विद्यापीठात शिकत असताना त्यांनी स्टार्टअपसाठी ही कल्पना मांडली होती. पण, त्यांना गुंतवणूकदार मिळाले नाहीत. फक्त आणि फक्त चिकन विंग्ज बनवणारं हॉटेल कसं असू शकेल, असं तेव्हा लोकांना वाटलं. पण, ते फक्त यशस्वी झाले नाहीत तर अब्जाधीशही झाले. (Billionaire Boss)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.