- ऋजुता लुकतुके
जगभरात अब्जाधीशांच्या संख्येच्या बाबतीत भारत हा अमेरिका आणि चीनच्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२४ मध्ये भारतात तब्बल १८५ निवासी अब्जाधीश आहेत. युबीएस ताज्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेत ८३५ तर चीनमध्ये ४२७ अब्जाधीश आहेत. आणि त्या खालोखाल भारताचा क्रमांक लागतो. भारतापुरतं बोलायचं झालं तर गेल्यावर्षीच्या तुलनेत ३२ अब्जाधीशांची भर पडली आहे. म्हणजेच भारतीय अब्जाधीशांच्या मालमत्तेत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Billionaires in India)
(हेही वाचा – ईव्हीएमवर शंका असल्यास खासदारांनी राजीनामा द्यावा; Navneet Rana यांचा विरोधकांवर निशाणा)
२०१५ पासून देशात अब्जाधीशांच्या संख्येत तब्बल १३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतातील एकूण अब्जाधीशांची मालमत्ता ९०५ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. त्यामुळे मालमत्तेतील वाढीच्या बाबतीत सध्या भारत प्रथम क्रमांकावर आहे. (Billionaires in India)
(हेही वाचा – Border – Gavaskar Trophy, Adelaide Test : रोहित शर्माची धोनी आणि विराटच्या या नकोशा विक्रमाशी बरोबरी)
अमेरिकेत मागच्या वर्षभरात ८५ अब्जाधीशांची भर पडली आहे. त्यामुळे अब्जाधीशांची मालमत्ताही ४.८ ट्रिलियन अमेरिकन डॉलरवरून ५.७ ट्रिलियन अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. चीनमधील अब्जाधीशांची संख्या ९८ ने कमी झाली आहे. जगभराचा आढावा घेतला तर २०१५ मधील १,७५७ अब्जाधीशांच्या तुलनेत ही संख्या २०२३ मध्ये २,६८२ वर गेली आहे. देशातील नोंदणीकृत कंपन्यांची संख्याही या कालावधीत वाढली आहे आणि या बाबतीही भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील ओद्योगिक कुटुंबांमध्ये वाढ झाली आहे. (Billionaires in India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community