सध्या मोठ्या प्रमाणात गेमिंग इंडस्ट्री वाढत आहे. दररोज नवनवीन गेम येत आहेत. या गेमिंग कंपन्या मोठ्या संख्येने विदेशी आहेत, ज्या कर चुकवून कोट्यवधींचा पैसा परदेशात पाठवत असल्याचे समोर आले आहे. याविषयीचा सरकारचा अहवाल आला आहे. या कंपन्या कर चुकवून तो पैसा क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून परदेशात पाठवत आहेत.
विदेशी गेमिंग कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी कर यंत्रणेतील अधिकाऱ्यांची दमछाक होताना दिसत आहे. कारण, या कंपन्या भारतात कमावलेले पैसे बाहेर नेण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करत आहेत. यासाठी शेल कंपन्यांचा आणि इतर माध्यमांचा वापर करत असल्याने देशाला कोट्यवधींचा फटका बसला आहे.
गेमिंग कंपन्यांकडून हजारो कोटींची कर चुकवेगिरी
स्मार्टफोनचा प्रसार जसा झाला त्याचप्रकारे भारतात वेगवेगळ्या ॲप्सचा प्रसार वाढला आहे. अशातच, गेमिंग ॲप्सने बाजारात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये आज एकतरी गेमिंग ॲप डाऊनलोड केलेले असेल. अनेक जण त्याच्या आहारी देखील गेले असले आणि त्या खेळासाठी अनेक पैसे देखील खर्च केले असतील आणि हेच तुमचे खर्च झालेल्या पैशातून ह्या गेमिंग कंपन्यांकडून कर चुकवेगिरी केली जात असल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम छोटी मोठी नसून तब्बल हजारो कोटींच्या जवळपास असल्याची माहिती जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने दिली आहे.
Join Our WhatsApp Community