Binny Bansal Retired : फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिनी बंसल यांचा राजीनामा

फ्लिपकार्टमधील आपली हिस्सेदारी विकून बन्सल अधिकृतपणे कंपनीतून बाहेर पडले आहेत. 

242
Binny Bansal Retired : फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिनी बंसल यांचा राजीनामा
Binny Bansal Retired : फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिनी बंसल यांचा राजीनामा
  • ऋजुता लुकतुके

फ्लिपकार्टमधून सहसंस्थापक बिनी बन्सल आता अधिकृतपणे बाहेर पडले आहेत. त्यांनी संचालक मंडळातून राजीनामा दिला आहे. १६ वर्षांपूर्वी त्यांनी ही ई-कॉमर्स कंपनी स्थापन केली होती. त्यानंतर अलीकडे वॉलमार्ट कंपनीने फ्लिपकार्टचा निर्णायक वाटा विकत घेतला होता. काही महिन्यांपूर्वी बन्सल यांनी कंपनीतील आपला पूर्ण हिस्सा विकला होता. आता संचालक मंडळातूनही ते बाहेर पडले आहेत. (Binny Bansal Retires)

त्यामुळे फ्लिपकार्टचे दोन्ही मूळ संस्थापक सचिन बन्सल आणि बिनी बन्सल आता कंपनीतून बाहेर पडले आहेत. सचिन यांनी काही वर्षांपूर्वीच नवी ही फिनटेक कंपनी स्थापन केली आहे. तर बिनी बन्सलही नवीन ई-कॉमर्स कंपनी सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याचं समजतंय. बिनी आणि फ्लिपकार्ट अशा दोघांनी राजीनाम्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. (Binny Bansal Retires)

(हेही वाचा – Uniform Civil Law : उत्तराखंडमध्ये विशेष अधिवेशन ; ५फेब्रुवारीला समान नागरी कायदा संमत होणार?)

ऑपडोअर ही कंपनी ई-कॉमर्स उद्योगाला या सेवा पुरवेल

‘मागच्या १६ वर्षांत फ्लिपकार्टने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे. सध्याचं कंपनीचं नेतृत्वही चांगलं आहे. आणि इथून पुढे कंपनीची वाटचाल सकारात्मकच असेल याचा विश्वास वाटतो. कंपनी चांगल्या हातात सोपवून मी बाहेर पडतो आहे याचं समाधान आहे,’ असं बन्सल यांनी म्हटलं आहे. (Binny Bansal Retires)

त्यांनी काही महिन्यांपूर्वी कंपनीतील आपली हिस्सेदारी जवळ जवळ १.३ अब्ज अमेरिकन डॉलरना विकली होती. आणि या पैशातून आता ते ई-कॉमर्स कंपन्यांना सेवा पुरवणारी कंपनी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. ऑपडोअर ही त्यांची प्रस्तावित कंपनी ई-कॉमर्स उद्योगाला डिझाईनिंग, उत्पादन, मनुष्यबळ आणि इतर तांत्रिक सेवा पुरवेल. (Binny Bansal Retires)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.