आता रेशनच्या दुकानात मिळणार बायोडिझेल!

133

आता रास्त भाव दुकानातून विक्रीसाठी बायोडिझेल उपलब्ध केले जाणार आहे. प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आता रेशन दुकानातून बायो डिझेल विक्री करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील दुकानदारांना हे फायदेशीर होणार आहे. प्रतिलिटर डिझेलहून १० रुपये दर कमी असणार आहे. यामुळे रेशन दुकानदारांना आर्थिक लाभही होणार आहे.

बायोडिझेलही विकण्याची परवानगी

डिझेलमुळे प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. त्यास पर्याय म्हणून बायो डिझेल उपलब्ध झाले आहे. जेसीबी, ट्रॅक्टर व ट्रकसाठी हे वापरता येणार आहे. शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांना चांगली सुविधा मिळेल. नाशिक येथील कंपनीकडून रेशन दुकानदारांना डिलरशीप दिली जाणार आहे. रेशन दुकानदारांना सीएससी सेंटर, किराणा साहित्य व ग्रामोद्योग विभागाने वस्तू विकण्यास परवानगी दिली आहे. आता बायोडिझेलचीही  विक्री करता येणार आहे.

( हेही वाचा: महाराष्ट्रात ओला -उबर होणार बंद? उच्च न्यायालय म्हणाले…)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.