- सचिन धानजी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांची कार्यालयीन उपस्थिती लिनक्स आधारित फेशियल बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचा अवलंब केला जात असून एक जानेवारी २०२५ पासून जुनी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद केली जात आहे. या फेशियल बायोमेट्रिक मशीन करता ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ७९ हजार ८१५ कामगार, कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे सुमारे १० हजार ७७३ कर्मचाऱ्यांची नोंदणी शिल्लक असली तरी महापालिकेने पूर्व सूचना दिल्याप्रमाणे १ जानेवारी २०२५ पासून याची सुरुवात केल्याने ज्या कर्मचाऱ्यांनी आपली फेशियल मशीन हजेरीची नोंदणी केली नाही त्यांची हजेरी ग्राह्य धरली जाणार नसल्याने येत्या फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या पगारात यासर्व नोंदणी न केलेल्या कामगार, कर्मचाऱ्यांच्या पगाराला हजेरी न नोंदवली गेल्याने कात्री लागण्याची दाट शक्यता आहे. (Biometric Attendance)
मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांची कार्यालयीन उपस्थिती लिनक्स आधारीत फेशियल बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविणे आणि यासाठी रजा व्यवस्थापन प्रणाली तसेच सध्याच्या हजेरी संगणक प्रणालीत बदल तथा सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. सध्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांची हाताच्या बोटांच्या ठशांद्वारे कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवली जाते. हाताच्या बोटांच्या ठशाद्वारे उपस्थिती नोंदवायची सध्याच्या बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे मेणाच्या अंगठ्याच्या वापर करून बोगस उपस्थिती नोंदवण्याचे प्रकार उघडकीस आले. (Biometric Attendance)
(हेही वाचा – येत्या १ जानेवारीपासून जुनी Biometric Attendance बंद; नवीन फेशियल बायोमेट्रिक हजेरी न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निघणार नाही पगार)
त्यामुळे सध्याची बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद करून नवीन फेशियल बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रायोगिक तत्वावर १५० मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या फेसियल प्रणालीचा वापर केल्यास कोणत्याही दिवसाच्या उपस्थितीसाठी प्रथम नोंदीत वेळ व अंतिम नोंदीत वेळ ग्राह्य धरण्यात येते. सुमारे १०० कर्मचाऱ्यांकरता एक याप्रमाणे फेशियल बायोमेट्रिक मशिन खरेदी करण्यात येत असून त्यानुसार आतापर्यंत विविध कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार १८०० मशिन्स बसवण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग आणि यांत्रिक व विद्युत विभागाच्या माध्यमातून दिली जात आहे. (Biometric Attendance)
सामान्य प्रशासन विभागाच्या म्हणण्यानुसार, १ जानेवारी २०२५ पासून जुनी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद करण्यात येत असली आतापर्यंत फेशियल बायोमेट्रिक हजेरी प्रणालीच्या वापराकरता महापालिकेच्या विविध विभागांच्या एकूण ९० हजार ५८८ कर्मचाऱ्यांपैंकी मंगळवारी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुमारे ७९ हजार ८१५ कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर सुमारे १० हजार ७७३ कर्मचाऱ्यांनी या नवीन प्रणालीकरता नोंदणी केलेली नाही. त्यामुळे या नवीन हजेरी प्रणालीच्या वापराकरता कर्मचाऱ्यांनी नोंदणी न केल्यास त्यांना फेशियल बायोमेट्रिक हजेरी नोंदवता येणार नाही, परिणामी १ जोनवारीपासून जुनी बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचा वापर ग्राह्य धरली न झाल्यास त्यांच्या फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या जानेवारी महिन्याच्या मोठा फरक दिसून येणार आहे. यामध्ये पगाराची रक्कम कापली जाणे किंवा पूर्णपणे हजेरी अभावी पगारच न होणे असे प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी अद्यापही आपली हजेरी बाबतची नोंदणी नवीन फेशियल बायोमेट्रिक हजेरीबाबत नोंदणी न केल्यास त्वरित केली जावी, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने केले जात आहे. (Biometric Attendance)
कर्मचाऱ्यांनी कुठे जाऊन करावी नोंदणी?
ज्या कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक फेशियल सेल्फ रजिस्ट्रेशन केलेले नाही अशा कर्मचाऱ्यांनी रजिस्ट्रेशन करण्याकरिता https://bmc.face-attendance.in/face-registration (Web URL Link) ही लिंक जाऊन आपली हजेरीबाबतची नोंदणी करावी, असे सामान्य प्रशासनाने आवाहन केले आहे. (Biometric Attendance)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community