शासकीय आणि महापालिका कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी ‘या’ तारखेपर्यंत बंद!

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्ण वाढीचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मंत्रालयातील तसेच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थितीची नोंदणी बायोमेट्रीक प्रणालीवर करण्यात येत आहे. त्यामुळे रोगप्रसाराचा अधिक धोका लक्षात घेता, ही प्रणाली तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३१ जानेवारी २०२१ पर्यंत ही प्रणाली स्थगित करण्यात येत असल्याचे परिपत्रक शासनाने जारी केले आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेनेही याबाबत परिपत्रक जारी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

रोगाचा धोका अधिक

कोरोना विषाणूने बाधित होणा-या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्ण वाढीचा दरही दिवसेंदिवस उंचावत आहे. मंत्रालयातील तसेच राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थितीची नोंदणी बायोमेट्रीक प्रणालीवर करण्यात येत आहे. यामधून रोगाचा धोका अधिक होत असल्याने याला तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करणे अत्यावश्यक आहे. कोरोना विषाणुच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंटमुळे रुग्ण वाढीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कार्यालयीन उपस्थिती बायोमेट्रीक प्रणाली स्थगित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

(हेही वाचा ओमायक्रॉनसाठी काय आहेत नवे होम क्वारंटाईनचे नियम, वाचा…)

१५ दिवसांत कार्यवाही करण्याचे निर्देश

मंत्रालय व नवीन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची कार्यालयीन उपस्थिती नोंदविण्यासाठी बसविण्यात आलेल्या बायोमेट्रिक मशिन्स पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे, उपस्थिती नोंदविताना होणारी गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी मंत्रालय व नवीन प्रशासकीय इमारतींच्या प्रत्येक मजल्यावर बायोमेट्रिक मशिन्स बसविण्याबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाने १५ दिवसांत कार्यवाही करावी, मंत्रालय व नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर बायोमेट्रिक मशिन्स माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत बसविण्यात येईपर्यंत मंत्रालय व नवीन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयातील
अधिकारी / कर्मचारी यांच्या कार्यालयीन उपस्थितीकरिता बायोमेट्रीक प्रणालीचा वापर ३१ जानेवारी, २०२२ पर्यंत स्थगित करण्यात यावा, असे निर्देश जारी केले आहेत. या कालावधीत अधिकारी, कर्मचारी यांची कार्यालयातील उपस्थिती हजेरी पटावर नोंदविण्यात यावी, असे या निर्देशात म्हटले आहे.

मुंबई महापालिकेने यापूर्वी १७ जानेवारीपर्यंत बायोमेट्रीक हजेरीला स्थगिती दिली होती, परंतु आता शासनाचे आदेश असल्याने महापालिकेने ३१ जानेवारीपर्यंत बायोमेट्रीक हजेरी प्रणालीचा वापर करण्यास स्थगिती देण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर ते जारी केले जाईल, असे सामान्य विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here