बिपरजॉय चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यांवर थैमान घातले आहे. अशातच समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेले ६ जण सोमवार, १२ जून रोजी बुडाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना सायंकाळी ५ वाजून २८ मिनिटाला घडली. एनडीआरएफला ५ पैकी १ जणाला वाचवण्यात यश मिळाले असून ४ जण समुद्रात बेपत्ता झाले असून त्या ४ जणांचा शोध अजूनही सुरु आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता लोकांना आणि पर्यटकांना समुद्रकिनारी न जाण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. समुद्र खवळलेला असल्याने लोकांच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. तसेच मच्छीमारांनीही मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
(हेही वाचा Muslim : बंगळुरूमध्ये ‘शरीफ’ बनला बेशरम; परदेशी नागरीकाचा केला छळ)
रत्नागिरीला गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याला सलग दोन दिवस बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका बसत आहे. सुमारे साडेपाच मीटरहून अधिक ऊंचीच्या अजस्त्र लाटा किनाऱ्याला धडकत असल्यामुळे किनाऱ्यालगत असलेल्या छोट्या दुकानदारांना दुकानात पाणी शिरल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तर समुद्र शांत होईपर्यंत पर्यटकांना समुद्रकिनारी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community