अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘बिपरजॉय’ (Biporjoy Cyclone) नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं आहे. पुढील 24 तासांत या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या मार्गाचा अंदाज येईल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे.
पाऊस लांबण्याची शक्यता
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, ५ जून रोजी दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) तयार झालं. पुढील २४ तासांत त्या प्रदेशात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. मान्सून आधी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने पावसावर याचा परिणाम झाला आहे.
मुंबई हवामान विभागाने या संदर्भात एक ट्विट केले आहे, त्यानुसार दक्षिण पश्चिम अरबी समुद्रावर बिपरजॉय (Biporjoy Cyclone) चक्रीवादळ तयार झालं आहे. हे चक्रीवादळ सरासरी समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटरपर्यंत पसरलं आहे. या बिपरजॉय चक्रीवादळामुळे पुढील 24 तासांत दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची दाट शक्यता आहे.
A cyclonic circulation lies over Southeast Arabian Sea and extends upto 5.8 km above mean sea level. Under its influence a Low Pressure Area is very likely to form over the same region during next 24 hours.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 5, 2023
(हेही वाचा – Energy Project : कोकणात उभारणार ४ जलविद्युत निर्मिती प्रकल्प; ४४ हजार कोटींच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षरी)
सतर्कतेचा इशारा
तसेच 8, 9, 10 जून रोजी कर्नाटकात गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीच्या भागात वादळी वार्याचा वेग 40-50 kmph, 60 kmph पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच, नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर (Biporjoy Cyclone) समुद्र खवळलेला असण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीवर कोणीही जाऊ नये विशेषतः मच्छिमारांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
8, 9, 10 June ला कर्नाटकात गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टीच्या भागात वादळी वार्याचा वेग 40-50 kmph, 60 kmph पर्यंत पोहोचण्याची शक्यता.
नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टी समुद्र खवळलेला असण्याची शक्यता.मच्छिमारांनी क्षेत्रात जाऊ नयेhttps://t.co/Bt1OMDfC2t pic.twitter.com/TAK27ViMMW— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 6, 2023
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पाऊस होणार नाही. तसेच मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन देखील करण्यात आले आहे.
National Bulletin No 1: दक्षिण-पुर्व अरबी समुद्रात Depression.
~1120km दक्षिण-द/पश्चिम मुंबई पासून
920km पश्चिम-द/प. गोवा
1160km दक्षिण पोरबंदर & 1520km द. कराचीपुढच्या 24 तासात उत्त्तर दिशेने सरकणार,🌀चक्रिवादळाची शक्यता,पुर्वमध्य अरबी समुद्रात व दक्षिण-पुर्व अरबी समुद्रात
IMD pic.twitter.com/GZC3a2HB3e— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 6, 2023
आज म्हणजेच मंगळवार ६ जून रोजी पहाटेच्या स्थितीचा अभ्यास करून हवामान विभागाने ही माहिती दिली आहे.
हेही पहा –
पुढच्या २४ तासांत हे चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) उत्तर दिशेने सरकणार आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण- पश्चिम अरबी समुद्रात सध्या ही स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईपासून ११२० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.
Join Our WhatsApp Community