Biporjoy Cyclone : गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे पुराचा इशारा; आठ जिल्ह्यांना हाय अलर्ट

आत्तापर्यंत ३० हजार पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

210
Biporjoy Cyclone : गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे पुराचा इशारा; आठ जिल्ह्यांना हाय अलर्ट

बिपरजॉय चक्रि‍वादळाने रौद्ररुप धारण केलं आहे. ‘बिपरजॉय’च्या (Biporjoy Cyclone) प्रभावामुळे गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे पुराचा इशारा देण्यात आला आहे. आज म्हणजेच बुधवार १४ जून रोजी सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्र प्रशासन हाय अलर्टवर आहे. हे चक्रीवादळ आता मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्ट्टी भागात धडकण्याची शक्यता आहे.

गुजरातमधील आठ जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सौराष्ट्र आणि कच्छ यांना रेड अलर्ट (Biporjoy Cyclone) जारी करण्यात आला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी लोकांना वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आत्तापर्यंत ३० हजार पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Monsoon : अखेर ‘या’ तारखेपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होणार)

एनडीआरएफची तयारी

बिपरजॉय चक्रीवादळाच्या (Biporjoy Cyclone) पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या १७ आणि एसडीआरएफच्या १२ पथके तैनात करण्यात आली आहेत.

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी घेतला आढावा

त्याचवेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले की, “बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) गुजरातच्या कच्छ जिल्ह्याकडे सरकत असताना रेशन आणि अन्नाची व्यवस्था आणि निवारागृहे उभारली जात आहेत. वैद्यकीय आणि आरोग्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत. दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले, “बिपरजॉय चक्रीवादळासाठी आमचे सैन्य पूर्ण तयारी करत आहे. भुजच्या लष्करी तळावर मी या तयारीचा आढावा घेतला. या संभाव्य संकटाबाबत त्यांनी लष्कराच्या जवानांशीही चर्चा केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.