Biporjoy Cyclone : राज्यात १६ जूनपर्यंत पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार पोषक वातावरण राहिल्यास राज्यात १६ जूनला मोसमी वारे दाखल होतील आणि २२ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून पुढे वाटचाल करेल, असा अंदाजही डॉ. कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.

203
Biporjoy Cyclone : राज्यात १६ जूनपर्यंत पावसाची शक्यता

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘बिपोरजॉय’ (Biporjoy Cyclone) नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं आहे. त्यामुळे अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या ‘बिपोरजॉय’ चक्रीवादळाच्या दिशेवर मोसमी वाऱ्याची आगामी वाटचाल अवलंबून आहे. मात्र, पोषक वातावरण राहिल्यास राज्यात १६ जूनला मोसमी वारे दाखल होतील आणि २२ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून पुढे वाटचाल करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

केरळमधील १४ हवामान केंद्रांपैकी सात केंद्रांच्या कार्यक्षेत्रात हलका पाऊस सुरू आहे. ढगांची दाटीही वाढत आहे. केरळमध्ये मोसमी (Biporjoy Cyclone) वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे लवकरच केरळमध्ये मोसमी वाऱ्यांचे आगमन होईल, असे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार पोषक वातावरण राहिल्यास राज्यात १६ जूनला मोसमी वारे दाखल होतील आणि २२ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून पुढे वाटचाल करेल, असा अंदाजही डॉ. कश्यपी यांनी व्यक्त केला आहे. (Biporjoy Cyclone)

(हेही वाचा – Mumbai Water Reservoir : मुंबईला १८ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा, पण…)

‘बिपोरजॉय’ची दिशा महत्त्वाची

अरबी समुद्रात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ‘बिपोरजॉय’ (Biporjoy Cyclone) चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे वादळ मुंबईपासून सुमारे एक हजार किलोमीटर अंतरावर समुद्रात तयार होईल. सध्याच्या स्थितीनुसार ते पश्चिम दिशेला झुकण्याची शक्यता आहे. मात्र, चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल केल्यास संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडेल. त्याचा फायदा मोसमी वाऱ्यांना होऊन मोसमी वाऱ्यांचा वेग वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभाग चक्रीवादळाच्या दिशेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

सतर्कतेचा इशारा

तसेच 8, 9, 10 जून रोजी कर्नाटकात गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीच्या भागात वादळी वार्‍याचा वेग 40-50 kmph, 60 kmph पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच, नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर (Biporjoy Cyclone) समुद्र खवळलेला असण्याची शक्यता असल्याने किनारपट्टीवर कोणीही जाऊ नये विशेषतः मच्छिमारांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.