बिरभूम हिंसा प्रकरणी 4 जणांना मुंबईतून अटक

115

पश्चिम बंगालमधील बिरभूम हिंसा प्रकरणी सीबीआयने 4 संशयीतांना मुंबईतून अटक केली. कोलकता उच्च न्यायालयाने 21 मार्च रोजी बिरभूम हिंसेच्या घटनेवर सीबीआयच्या प्राथमिक तपास रिपोर्ट रेकॉर्डमध्ये घेतला होता. या हिंसेत साधारण 8 जणांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले होते. यापूर्वी गोरखनाथ मंदिरात हल्ला झाला होता. यात अहमद मुर्तझा अब्बासी याला पोलिसांनी अटक केली आहे. हा देखील सानपाडा येथील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे झालेल्या हल्ल्यांमधील मुंबई कनेक्शन समोर आल्यामुळे चिंता वाढली आहे.

लॉकडाऊनमध्ये संपूर्ण कुटुंब गोरखपूरला शिफ्ट

सीबीआयने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, या प्रकरणात पुराव्याचा एक मोठा भाग नष्ट करण्यात आला आहे. तर भादू शेख यांच्या हत्या प्रकरणात राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितते की, ही केस पोलिसांकडून पाहिली जात आहे. त्यात सीबीआयला देण्याची काही आवश्यकता नाही. अहमद मुर्तझा अब्बासी हा आयआयटी बॉम्बेचा माजी विद्यार्थी आहे. 8 ऑगस्ट 2015 रोजी 53व्या दीक्षांत समारंभात त्याला केमिकल इंजिनीअरिंग या शाखेची पदवी प्रदान करण्यात आली होती. यूपी एटीएस टीम अहमद मुर्तझाच्या नवी मुंबईतल्या घरी चौकशीसाठी गेली होती. नवी मुंबईतले हे घर मुर्तझाने चार वर्षांपूर्वीच विकल्याची माहिती या चौकशीत समोर आली. यूपी एटीएसची दोन जणांची टीम बुधवारी, 6 एप्रिल रोजी मुंबईत आली होती. ही टीम 5 एप्रिल 2022 दुपारी साडेबारा वाजताच्या फ्लाइटने परतणार आहे. सानपाडा येथील मिलेनियन टॉवरनंतर आता सीवूड सेक्टर 50 मधील ताज हाईट्समध्ये देखील तो राहत असल्याचे समोर आले. 2015 ते 2020 पर्यंत अहमद मूर्तझा सीवूड येथे राहण्यास होता. 2020 साली लॉकडाऊनमध्ये संपूर्ण कुटुंब गोरखपूरला शिफ्ट झाले. एनआरआय पोलिसांकडून ताज हाईट्समधील रहिवाशांची विचारपूस सुरू करण्यात आली आहे. तसेच भाडेकरुंना भेटण्यासाठी अहमद मूर्तझाचे वडील 5 दिवसांपूर्वी आले होते. नेम प्लेट आणि उरलेले काही सामान घेऊन पुन्हा गोरखपूरला निघून गेले.

(हेही वाचा संपकरी एसटी कामगारांच्या हाताला काही लागले नाही!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.