नागपूरमध्ये Bird Flu चा शिरकाव ; पालिकेच्या सर्व्हेला सुरुवात

73
नागपूरमध्ये Bird Flu चा शिरकाव ; पालिकेच्या सर्व्हेला सुरुवात
नागपूरमध्ये Bird Flu चा शिरकाव ; पालिकेच्या सर्व्हेला सुरुवात

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील मांगली पाठोपाठ आता नागपूर (Nagpur) शहरातही ‘बर्ड फ्लू’ची (Bird Flu) लागण झाल्याचं समोर आलं आहे. दोन्ही जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’ची प्रकरणं समोर आल्यानं प्रशासन सतर्क झालं आहे. या पार्श्वभूमीवर ‘बर्ड फ्लू’बाधित ताजबाग येथील एक किमी त्रिज्येतील क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आलं आहे. (Bird Flu)

हेही वाचा-Delhi च्या ‘या’ मतदारसंघात विजय मिळवणारा पक्षच करतो सरकार स्थापन

नागपुरच्या ताजबाज भागातील बाधित क्षेत्रात आरोग्य विभागाकडून (Health Department) घरांचे सर्वेक्षण सुरु केलं आहे. मनपाच्या आरोग्य विभागाकडून आठ हजार घरांचे सर्वेक्षण करत 26 हजार 927 जणांची प्रकृतीची विचारपूस केली आहे. यात 141 जणांमध्ये इंल्युएन्झासदृश (Influenza) आजाराचे लक्षणे आढळून आली आहेत. यापैकी 14 रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाचे लक्षण दिसून आल्यानं त्यांचे नमुने नागपूरच्या एम्समध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. बर्ड फ्लूचा वाढता धोका लक्षात घेऊन या भागातील 3 हजार 54 कोंबडी नष्ट करण्यात आल्या होत्या. (Bird Flu)

हेही वाचा-BMC Budget 2025-26 : महापालिका अर्थसंकल्पाचा आकडा सात वर्षांनी वाढला तब्बल ५० हजार कोटींनी

ताजबाग येथील यासीन प्लॉट परिसरात तीन कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू (Bird Flu) मुळे झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परिसरातील 3 हजार 54 कोंबड्या नियमानुसार मारून जमिनीत पुरल्या होत्या. तर त्यांचे एक हजार किलोपेक्षा जास्त खाद्यही नष्ट केले होते. बर्ड फ्लुमुळे (Bird Flu) मृत्यू पावलेल्या कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्यांना Tamiflu औषध देण्यात आले आहे.

हेही वाचा-Worli Adarsh ​​Nagar खंडणी प्रकरणात खडणीखोरामागे राजकीय वरदहस्त असल्याचा वकीलाचा दावा

नियमानुसार पशुसंवर्धन विभागाने यासीन प्लॉटच्या अवतीभवतीचा एक किलोमीटर चा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केला होता. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने बर्ड फ्लू (Bird Flu) च्या नियमानुसार त्या परिसरातील 3 हजार 54 कोंबड्या मारल्या होत्या. नागपूरमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याने सामान्य नागरिक आणि पोल्ट्री व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. (Bird Flu)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.