कोरोनानंतर WHO ने आणखी एका विषाणू संदर्भात धोत्याचा इशारा दिला आहे. बर्ड फ्लूमुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली असून पक्षांव्यतिरिक्त इतर सस्तन प्राण्यांमध्येही बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. मिंक, ऑटर, कोल्हा, सील या सस्तन प्राण्यांनाही H1N1 फ्लूचा संसर्ग झाला आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.
( हेही वाचा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?)
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते H1N1 फ्लूचा सध्या धोका कमीआहे. मात्र, या आजाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही. यापासून मानवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे. परंतु घाबरण्याचे कारण नाही, असे WHO ने स्पष्ट केले आहे. WHO ने बर्ड फ्लूपासून बचाव करण्यासाठी काही सूचना केल्या आहेत.
- कोणत्याही आजारी किंवा मृत वन्य प्राणी किंवा पक्ष्याला स्पर्श करू नका किंवा त्याच्या जवळ जाऊ नका.
- असा प्राणी आढळल्यास स्थानिक अधिकारी किंवा प्रशासनाला याबाबतची माहिती द्या.
- यासोबतच आजारी किंवा मृत कोंबड्यांबाबत जास्त खबरदारी बाळगण्याची आणि काळजी घेण्याची गरज WHO ने व्यक्त केली आहे.
बर्ड फ्लू कसा पसरतो?
बर्ड फ्लू संक्रमित पक्ष्यांना संक्रमित करून, संक्रमित प्राण्यांच्या विष्ठेला किंवा त्या प्राण्याच्या राहण्याच्या जागेच्या संपर्कात आल्यावर पसरतो. संक्रमित प्राणी किंवा पक्षी खाल्ल्यास याचा संसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
Join Our WhatsApp Community