पक्ष्यांच्या 338 प्रजातींच्या संख्येत झालेल्या बदलांबाबत पक्षीनिरीक्षकांनी अभ्यास केला. या अभ्यासानुसार, देशभरातील सुमारे 60 टक्के पक्ष्यांच्या प्रजाती गेल्या 30 वर्षांत कमी झाल्याची नोंद, देशभरातील 30 हजार पक्षीनिरीक्षकांनी नोंदवली असल्याचे त्यांनी सादर केलेल्या एका अहवालात म्हटले आहे.
तसेच, गेल्या 7 वर्षांत या बदलाचे मूल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये 359 प्रजातींपैकी 40 टक्के प्रजाती घटल्या आहेत, असे स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्सने दिलेल्या अहवालात सादर करण्यात आले आहे.
(हेही वाचा –Chandrasekhar Bawankule : अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल – चंद्रशेखर बावनकुळे )
दक्षिण आशियातील वेटलँडस् इंटरनॅशनलचे संचालक एम. आनंद कुमार यांनी अहवालाला उत्तर देताना सांगितले की, पक्ष्यांच्या स्थानिक प्रजातींची स्थिती अत्यंत वाईट आहे, हे चिंताजनक आहे. या पक्ष्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे तसेच दक्षिण आशियातील वेटलँडस् इंटरनॅशनलचे संचालक रितेश कुमार म्हणाले की, बदकासारख्या पाणथळ पक्ष्यांची स्थिती चिंताजनक आहे. त्यांचा अधिवास आणि संवर्धनाच्या गरजांबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
पक्ष्यांच्या संवर्धनास प्राधान्य…
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारतीय प्राणी शास्त्र यासह 13 सरकारी आणि इतर संस्थांच्या गटाने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, मूल्यांकन केलेल्या 942 प्रजातींपैकी 204 प्रजाती कमी झाल्या आहेत, 98 प्रजाती स्थिर आहेत, 36 प्रजातींमध्ये वाढ झाली आहे, तर 338 प्रजाती दीर्घकालिन निर्धारित करण्यात आल्या आहेत. या अहवालात नॉर्दन शोव्हलर, नॉर्दन पिनटेल, कॉमन टील, टफ्टेड डक, ग्रेटर फ्लेमिंगो, सारुस क्रेन, इंडियन कोर्सर आणि अंदमान सर्पेंट इगल अशा 178 पक्ष्यांच्या संवर्धनास प्राधान्य देण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community