हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर कट्टरपंथींकडून दगडफेक; मशिदीवरून दगडफेक करत Hindu ना केले लक्ष्य

175
हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर कट्टरपंथींकडून दगडफेक; मशिदीवरून दगडफेक करत Hindu ना केले लक्ष्य
हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर कट्टरपंथींकडून दगडफेक; मशिदीवरून दगडफेक करत Hindu ना केले लक्ष्य

गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदूंच्या (Hindu) शोभायात्रेवर कट्टरपंथींकडून हल्ला करण्यात येत आहे. यंदा असेच एक प्रकरण बिहारमधील पूर्व चंपारणच्या सीमेवर असलेल्या नेपाळमधील (Nepal) बीरगंज (Birgunj) येथील हनुमान जंयतीनिमित्त (Hanuman Jayanti) आयोजित शोभायात्रेवर कट्टरपंथींनी हल्ला केला आहे. दि.१२ एप्रिल २०२५ रोजी हनुमान जन्मोत्सव मिरवणुकीवर दगडफेक करून वातावरण बिघडवण्याचे काम कट्टरपंथींनी केले.

( हेही वाचा : Bhushan Gavai : महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश !

बीरगंजमध्ये जाळपोळ, दगडफेक

नेपाळमधील (Nepal) बिरगंजमधील (Birgunj) परिस्थिती इतकी भयानक होती की तोडफोड आणि जाळपोळही करण्यात आली. या हल्ल्यात सुमारे १२ हून अधिक पोलिस जखमी झाले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका व्यक्तीलाही दुखापत झाली आहे. मिरवणूक ईदगाह (पूर्व चंपारण जिल्ह्यातील रक्सौल शहराला लागून असलेल्या बीरगंजमधील छपकय्या परिसरात) पोहोचली तेव्हा परिसरातील परिस्थिती बिकट झाली आणि अचानक मदरशाच्या छतावरून दगडफेक सुरू झाली, अशी माहिती देण्यात आली आहे. (Hindu)

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण तणाव वाढला होता. जमावाने अनेक आस्थापनांची तोडफोड केली आणि दुचाकी गॅरेज आणि वाहनांना आग लावली. आता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी, शनिवारी संध्याकाळपासून रविवार सकाळपर्यंत परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. (Hindu)

गुना येथे मिरवणुकीवर दगडफेक

त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) गुना येथे झालेल्या दगडफेकीच्या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. मिरवणूक कर्नलगंज मशिदीत पोहोचल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आणि डीजे गाणी आणि घोषणाबाजीनंतर मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. (Hanuman Jayanti)

गुना येथे भाजपा नगरसेवक ओम प्रकाश कुशवाह (Om Prakash Kushwaha) उर्फ ​​गब्बर कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक काढली जात होती. दगडफेकीत त्यांचा ११ वर्षांचा मुलगा अकुल कुशवाहासह अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी भाजपा नगरसेवकाने एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी सांगितले की, दगडफेकीमागे ताजिया समितीचे अध्यक्ष युसूफ खान आणि इतरांचा हात होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Hindu)

तणाव निर्माण झाल्यानंतर १५-२० मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे पोलिसांनी सांगितले आणि सुरक्षेच्या कारणास्तव परिसरात मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मिरवणुकीत सहभागी झालेले लोक संतापले. ते एकत्र येत होते आणि दगडफेक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत होते. त्यांच्या मागण्या ऐकल्यानंतर प्रशासनाने त्यांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यास सांगितले. (Hindu)

या प्रकरणात, ओम प्रकाश कुशवाह यांच्या तक्रारीवरून, कोतवाली पोलिसांनी ५ जणांची नावे आणि इतर १५-२० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींची नावे विक्की खान, अमीन खान, विक्कीचे मुलगे, गुड्डू खान आणि तौफिक खान अशी आहेत. व्हिडिओ फुटेजच्या आधारे त्यांनी गुन्हेगारांची ओळख पटवली आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल. (Hanuman Jayanti)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.