Nitin Gadkari: आपल्या दैवताचे जन्मस्थान हा भारतीयांच्या अस्मितेचा विषय, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

अयोध्येच्या संघर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांनी मोठे योगदान दिले.

247
Nitin Gadkari: आपल्या दैवताचे जन्मस्थान हा भारतीयांच्या अस्मितेचा विषय, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
Nitin Gadkari: आपल्या दैवताचे जन्मस्थान हा भारतीयांच्या अस्मितेचा विषय, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचे निर्माण ही सर्व भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. अयोध्येचा संघर्ष मंदिर निर्माणासोबतच मंदिर निर्माण, भारतीय संस्कृती आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनाचा संघर्षसुद्धा होता, कारण अयोध्या हे भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रविवारी (१४ जानेवारी) केले.

अयोध्या संघर्षाचे अभ्यासक आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या ‘अयोध्या’ या मराठी ग्रंथाच्या ‘अयोध्या जो कभी पराजित नही हुई’ या हिंदी अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

(हेही वाचा – Anurag Thakur: 31 मार्चपर्यंत देशभरामध्ये एक हजार खेलो इंडिया केंद्राची स्थापना करणार)

अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रांत शाखेद्वारे शंकरनगर येथील साई सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला परिषदेचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री डॉ. पवनपुत्र बादल, संघटन मंत्री नितीन केळकर, ज्येष्ठ पत्रकार संदीप भारंबे, लखनसिंह कटरे, अविनाश पाठक, नरेश सबजीवाले प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या दैवताचे जन्मस्थान हा भारतीयांच्या अस्मितेचा विषय…
यावेळी गडकरी पुढे म्हणाले की, अयोध्येच्या संघर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांनी मोठे योगदान दिले. यावेळी त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेचे स्मरण केले. प्रभु श्रीराम भारतीयांचे दैवत आहेत. आपल्या दैवताचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या अयोध्येत त्यांचे मंदिर होऊ नये, तर कुठे व्हावे? हे जन्मस्थान भारतीयांच्या अस्मितेचा विषय आहे. हा जातीय किंवा धार्मिक मुद्दा मुळीच नाही, या पुस्तकातून अयोध्येचा संघर्ष भविष्यात पुढील पिढीपर्यंत पोहोचणार आहे, मात्र तो डिजिटल माध्यमातून पोहोचल्यास योग्य ठरेल, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त करून माधव भंडारी चिंतनशील व्यक्तिमत्त्व असल्याचेही ते म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.