Bitcoin Hits All Time High : बिटकॉईनचा जागतिक स्तरावर १,००,००० अमेरिकन डॉलरचा नवा उच्चांक

Bitcoin Hits All Time High : ट्रंप यांच्या नवीन राजवटीत बिटकॉईनला चांगले दिवस येतील असं बोललं जात आहे 

76
Bitcoin Hits All Time High : बिटकॉईनचा जागतिक स्तरावर १,००,००० अमेरिकन डॉलरचा नवा उच्चांक
Bitcoin Hits All Time High : बिटकॉईनचा जागतिक स्तरावर १,००,००० अमेरिकन डॉलरचा नवा उच्चांक
  • ऋजुता लुकतुके

बिटकॉईन ही जगातील सगळ्यात मोठी आणि महाग क्रिप्टोकरन्सी आहे. जागतिक स्तरावर या आभासी चलनाने चक्क १,००,००० अमेरिकन डॉलरचा टप्पा पार केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आपल्या नवीन राजवटीत या चलनासाठी अमेरिकेत सकारात्मक वातावरण तयार करतील असा अंदाज आहे. त्यामुळे चलनाला सध्या अच्छे दिन आल्याचं बोललं जात आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेनंही आभासी चलनावर एक अहवाल तयार केला असून त्यात ट्रंप प्रशासनाचा या चलनाकडे बघण्याचा दृष्टिकोण विशद करण्यात आला आहे. त्यामुळेही आभासी चलनाला नवीन उभारी आली आहे. (Bitcoin Hits All Time High)

(हेही वाचा- Harbhajan – Dhoni Dispute : हरभजन आणि धोनी यांच्यात वादाची ठिणगी नेमकी कुठे पडली?)

आपल्या दुसऱ्या कार्यकालात डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेतील आभासी चलनाचे प्रणेते पॉल ॲटकिन्स यांना युएस सेक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनचे अध्यक्ष घोषित केलं आहे. त्यानंतर बिटकॉईन या सगळ्यात जुन्या आभासी चलनामध्ये मोठी वाढ बघायला मिळाली आहे. रॉयटर्सने आकडेवारी संकलित केली तेव्हा बिटकॉईनचा ताजा दर १,०३,०४७ वर होता. ट्रंप इथून पुढे आभासी चलनावर असलेले निर्बंध कमी करतील आणि त्यातील ट्रेडिंग सोपं करतील, असा या क्षेत्रातील तज्जांचा होरा आहे. (Bitcoin Hits All Time High)

बिटकॉईनच्या स्थापनेला १६ वर्षं झाली आहेत. या कालावधीत हे आभासी चलन अनेक चढ उतारांना सामोरं गेलं आहे. २०२२ मध्ये बिचकॉईनची किंमत १६,००० अमेरिकन डॉलर इतकी खाली आली होती. आभासी चलनाचा फुगा फुटला असल्याची टीका तेव्हा झाली होती. पण, त्यानंतर हे चलन पुन्हा पर आलं. आणि आता बिटकॉईनने १,००,००० चा टप्पा पार केला आहे. (Bitcoin Hits All Time High)

(हेही वाचा- Virat Kohli : पत्नी अनुष्का शर्माने सांगितलं विराट कोहलीच्या तंदुरुस्तीचं रहस्य)

तज्ज यावर काय म्हणतात?

गौरव डहाके (सहसंस्थापक, कॉईन डीसीएक्स) – ‘१ लाखाचा टप्पा जरी मानसिक असला तरी हा टप्पा ऐतिहासिकही आहे. आभासी चलनाविषयीची भीती कमी होऊन अधिकाधिक गुंतवणूकदार आता आभासी चलनाकडे वळू लागतील. हे चलन वाईट नाही, असं आम्ही एक्सचेंजमधून वारंवार सांगत असतो. ते आता लोकांना पटेल.’ (Bitcoin Hits All Time High)

माईक नोव्होग्रात्झ (संस्थापक, गॅलेक्सी डिजिटल) – “मागची ४ वर्षं सर्वच देशांत राजकीय पक्ष आभासी चलनाविषयीच्या धोरणांविषयी साशंक होते. त्याचा परिणाम या चलनाला प्रतिष्ठा मिळण्यावर होत होता. पण, आता असं दिसू लागलं आहे की, आभासी चलन लवकरच मुख्य आर्थिक प्रवाहात येऊ शकेल.” (Bitcoin Hits All Time High)

(हेही वाचा- Patrakar Sanrakshan Kayda विषयी लवकरच नोटिफिकेशन काढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन)

(टीप – आभासी चलन हे गुंतवणुकीसाठी अत्यंत जोखमीचं साधन आहे. यात दिवसभरात प्रचंड चढ उतार पाहायला मिळतात. त्यामुळे आवश्यक माहिती करून घेतल्याशिवाय या गुंतवणूक करू नका. हिंदुस्थान पोस्ट आभासी चलनातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देत नाही.) 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.