Winter : संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी; केदारनाथ ते शिमला मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी

62
Winter : संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी; केदारनाथ ते शिमला मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी

उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीस सुरुवात झाली आहे. सर्वत्र पांढऱ्या शुभ्र बर्फाची चादर पसरली आहे. यामुळे संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट पसरली आहे. (Winter)

(हेही वाचा – BJP vs Congress : जॉर्ज सोरोसशी काँग्रेसचे मजबूत संबंध; भाजपाचा आरोप)

उत्तर भारतातील डोंगराळ प्रदेशात सर्वत्र बर्फाची चादर पसरलेली दिसून येत आहे. रस्‍त्‍यापासून झाडे, वेली, घरे अशा सर्वांवर पांढऱ्या शुभ्र बर्फाचे अच्छादन निर्माण झाले आहे. त्‍यामुळे या ठिकाणी मनमोहक दृष्‍य निर्माण झाले आहे. उत्तराखंडच्या केदारनाथ मध्येही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्‍टी झाली आहे. ज्‍यामुळे केदारनाथ मंदिर पांढऱ्या शुभ्र बर्फांने वेढल्‍याचे सुंदर चित्र दिसत आहे. तसेच चमोली, औली, बद्रीनाथ, जोशीमठसह उंचावरील पर्वतरांगा देखील मोसमातील पहिल्‍या बर्फवृष्‍टीने न्हाऊन निघाल्‍या आहेत. त्‍यामुळे पर्यटकही आनंदीत आहेत. उत्तराखंडच्या डोंगराळ भागात तुफान बर्फवृष्‍टी तर मैदानी प्रदेशात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी 2 ते 4 इंचापर्यंत बर्फाची चादर पसरलेली दिसून येत आहे. केदारनाथ धाममध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्‍टी झाल्‍याने या ठिकाणची सर्व कार्य तुर्तास बंद करण्यात आली आहेत. उंचावरील ठिकाणी होत असलेल्‍या बर्फवृष्‍टीमुळे मैदानी प्रदेशात थंड वारे वाहू लागल्‍याने कडाक्‍याची थंडी जाणवू लागली आहे. (Winter)

(हेही वाचा – विधानसभा अध्यक्षांनी असा निर्णय दिला की, सर्वोच्च न्यायालय अजून विचारच करतेय; Jayant Patil यांची कोपरखळी)

हवामान विभागाकडून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शितलहर येण्याची शक्‍यता वर्तवली आहे. हिमाचलमध्ये झालेल्‍या मोठ्या बर्फवृष्‍टीमुळे रस्‍त्‍यावर बर्फाची चादर पाहायला मिळत आहे. गाड्यांवरही बर्फाचा थर साचला आहे. गंगोत्री धाममध्येही बर्फवृष्‍टीमुळे बर्फाचा मोठा थर निर्माण झाल्‍याचे दिसून येत आहे.शिमलामध्येही मोसमातील पहिल्‍या बर्फवृष्‍टी झाली आहे. त्‍यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. या दरम्‍यान 2 ते 3 डिग्रीने तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. (Winter)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.