मुलुंड मार्केटच्या दुरुस्तीसाठी भाजप आक्रमक! महापालिकाने अखेर दिले हे आश्वासन! 

भाजप नगरसेविका सपना म्हात्रे यांनी चर्चगेट व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भुयारी मार्गातील गाळ्यांसाठी लॉटरी न काढता पुन्हा त्याच गाळेधारकांना हे गाळे वितरीत केल्याने महापालिकेचे मोठे नुकसान केल्याचा आरोप यापूर्वी हरकतीच्या मुद्याद्वारे केला.

मुलुंड मार्केटच्या दुरुस्तीचे काम पुनर्विकासाच्या नावाखाली रखडलेले असून अखेर प्रशासनाने याच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव गुंडाळल्याचे सांगत पुढील दीड महिन्यात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत दिले. त्यामुळे मुलुंडच्या दुरुस्तीचे रखडलेले काम हे आता मार्गी लावण्यासाठी बाजार विभागाला भाग पाडण्यात स्थानिक भाजप नगरसेविका रजनी केणी यांना यश आले आहे.

…आणि ठिय्या मारला!

बाजार  व उद्यान समितीच्या बैठकीत, भाजपच्या रजनी केणी व सपना म्हात्रे यांनी बाजार विभागाच्या अधिकाऱ्यांना पुरता घाम फोडला. मुलुंडच्या नगरसेविका रजनी केणी यांनीही मुलुंड मार्केटची दुरुस्ती पुनर्विकासाच्या नावाखाली केली जात नाही. ना याचा पुनर्विकास केला जात ना याची दुरुस्ती केली जात. याबाबत आपण वारंवार बाजार विभागाच्या अधिकाऱ्यांना जर पुनर्विकास केला जात नाही तर किमान दुरुस्ती करून गाळेधारकांना दिलासा दिला जावा,अशी मागणी करत आहे. परंतु अनेक सभांमधूनही ही मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे यापुढे ठोस आश्वासन दिल्याशिवाय आम्ही सभागृहातून बाहेरच जाणार नाही,असा पावित्रा घेत त्यांनी तिथेच जमिनीवर ठिय्या मारला घेतला.

(हेही वाचा : मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या ५,५०४! निर्बंधाबाबत महापालिका, सरकार उदासीन!)

मार्केटची दुरुस्ती पुनर्विकासाच्या नावाखाली रखडली!

केणी यांच्या मुद्दयाला पाठिंबा देत भाजपच्या सपना म्हात्रे यांनी चर्चगेट व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भुयारी मार्गातील गाळ्यांसाठी लॉटरी न काढता पुन्हा त्याच गाळेधारकांना हे गाळे वितरीत महापालिकेचे मोठे नुकसान केल्याचा आरोप यापूर्वी हरकतीच्यामुद्दयाद्वारे केला होता,याचे स्मरण करून देत याबाबत  कोणत्याही प्रकारे उत्तर न  दिल्यामुळे या मुद्दयाला धरुन म्हात्रे या पाली हिल येथील मंडईतील पुनर्विकासात झालेल्या गैरकारभाराचीही माहिती प्रशासन देत नाही, असे सांगत यातील आतापर्यंत इमारतींच्या पुनर्विकासात प्रकल्पबाधितांसाठी किती कमर्शियल गाळे उपलब्ध् झाले आहे आणि सध्या किती गाळे आहे याबाबतही माहिती विचारली होती, याचीही माहिती प्रशासन तीन ते चार वेळा चर्चा आणि मागणी करूनही देत  नाही. त्यामुळे समितीमध्ये वारंवार मागणी करूनही जर अधिकारी ही माहिती देत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावी मागणी म्हात्रे यांनी केली. मात्र, यावर प्रशासनाकडून उत्तर देण्यास कोणीही सक्षम अधिकारी नसल्याने मग म्हात्रे यांनी अतिरिक्त आयुक्तांना बोलवा अशी मागणी करत आक्रमक पावित्रा घेतला.

…अखेर ठिय्या आंदोलन मागे!

त्यानंतर, उपायुक्त रमाकांत बिरादर यांनी त्यांची समजूत घालत, मुलुंडमधील मंडईची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला जाईल आणि पुढील दीड महिन्यात याची अंमलबजावणी केली जाईल,असे आश्वासन रजनी केणी यांना दिले. तसेच सपना म्हात्रे, यांच्या चर्चगेट व छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गातील गाळे वितरण, प्रकल्पबाधितांचे गाळे तसेच पालीहिल मार्केटबाबतच्या सर्व मुद्दयांची लेखी माहिती पुढील आठ दिवसांमध्ये दिली जाईल,असे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here