रक्तदान श्रेष्ठ दान असं म्हटलं जात असलं, तरी कोविड काळात या रक्तदान शिबिरांचे आणि रक्तदात्यांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. रक्त संकलन पिशव्यांचेही प्रमाण कमी होऊन अनेक शासकीय आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर, मुंबईत रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. असे असले तरी प्रत्यक्षात या शिबिरांमध्ये भाजप आणि काँग्रेसच अधिक बाजी मारुन गेले आहेत. मात्र, शिवसेनेकडून आता पुढाकार घेतला जात असला, तरी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनला जो प्रतिसाद मिळायला पाहिजे होता, तेवढा शिवसेना शाखांमधून मिळताना दिसत नाही.
भाजप आघाडीवर
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरेाग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला रक्तदानासाठी आवाहन केले. तरी मुंबईत भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ५ एप्रिलपासून ५ हजार रक्त पिशव्यांच्या संकलनाचा संकल्प केला. त्यानुसार आतापर्यंत विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयेाजन करत २ एप्रिलपर्यंत ४ हजार ३०२ रक्त पिशव्यांचे संकलन केले. आमदार मनिषा चौधरी, आमदार सुनील राणे,आमदार अतुल भातखळकर, आमदार योगेश सागर आदींच्या मदतीने प्रत्येक नगरसेवकांच्या प्रभागांत रक्तदानाचे शिबिर आयेाजित करुन या पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. तर काहींनी हनुमान जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केले होते. काहींनी १ मे कामगार दिवस आणि त्यानंतर रविवारच्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयेाजन विविध राजकीय पक्ष आणि संस्थांकडून करण्यात आले.
(हेही वाचाः अंधेरी पाठोपाठ जोगेश्वरीतही भाजप नगरसेवकाच्या पुढाकाराने कोविड सेंटर!)
भांडुपमध्ये शिवसेना भाजपात चढाओढ
भांडुपमध्ये तर शिवसेना आणि भाजपमध्ये रक्तदानाची चढाओढच लागली असून, भांडुपमध्ये भाजपच्यावतीने तीन ठिकाणी तर शिवसेनेच्यावतीने एका ठिकाणी रविवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. भांडुपचे शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २३४ दात्यांनी रक्तदान केले. याबाबत बोलताना त्यांनी आपल्याकडे ६५० दात्यांची नोंदणी झालेली आहे. पण एकाच वेळी सर्वांना बोलावणे हे कोरोनाच्या नियमांना धरुन नाही. त्यामुळे नियमांचे पालन करताना पहिल्या टप्प्यात २३४ जणांचे रक्तदान पार पडले असून, सध्या राजावाडी व अन्य रुग्णालयांनी रक्तसाठा असल्याचे सांगितले आहे. उर्वरितांचे रक्तदान दुसऱ्या टप्प्यात सोशल डिस्टन्स राखून केले जाईल, असे कोरगावकर यांनी सांगितले.
रक्तदान शिबिरांची पक्षवार यादी
मात्र, एकूणच रक्तदान शिबिरांमध्ये भाजप बाजी मारुन गेला असून, सामाजिक बांधिलकी राखताना रक्तदानाचे महत्व ओळखून त्यांनी पक्षाची जबाबदारीही पार पाडण्याचा प्रयत्न केला. त्याखालोखाल काँग्रेसने बाजी मारलेली असून त्यानंतर शिवसेनेकडून पुढाकार घेतला जात आहे.
(हेही वाचाः दिलासादायकः बोरीवली व वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम विभाग मायक्रो कंटेन्मेंट झोनमुक्त!)
भाजप
- उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ५ हजार रक्त पिशव्या संकलनाचा संकल्प केला आहे. आतापर्यंत प्रत्येक विधानसभा व महापालिका प्रभागांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करुन, ५ एप्रिलपर्यंत ४ हजार ३०२ रक्त पिशव्यांचे संकलन करुन रुग्णालयांना देण्यात आले आहे.
- भाजप माहिम विधानसभा क्षेत्राच्यावतीने माहिम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर आणि जितेंद्र राऊत यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
- भांडुप पश्चिम येथील नगरसेविका साक्षी दळवी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन, ५२ रक्त पिशव्यांचे संकलन.
- घाटकोपर पश्चिम येथे भाजप आमदार राम कदम यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
- दक्षिण मुंबईतील गिरगाव खेतवाडी खंबाटा लेन येथे भारतीय युवा मोर्चाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन. भाजप नगरसेविका अनुराधा पोतदार, सरीता पाटील, मिनल पटेल, ज्योत्स्ना मेहता आदींची उपस्थिती.
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण मुंबई, रा.स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत, गिरगाव भाग आणि स्वर्गीय अनिकेत ओव्हाळ स्मृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गिरगाव निकदवारी लेन, चित्पावन ब्राह्मण संघात रक्तदान शिबिराचे आयोजन.
- भाजप युवा मोर्चा आयेाजित भांडुप सर्वोदय नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन, रोहित सुर्वे यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या शिबिरात ४० रक्त पिशव्यांचे संकलन.
- भांडुप येथील नरदास नगर येथे भाजपचे वॉर्ड अध्यक्ष सुभाष सावंत यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरात ७८ रक्त पिशव्यांचे संकलन.
- भाजपच्या कांदिवली येथील प्रभाग क्रमांक २७च्या वतीने व स्थानिक नगरसेविका सुरेखा पाटील यांच्या पुढाकाराने अल्का हॉलमध्ये पार पडले रक्तदान शिबिर.
- प्रभाग क्र. १७७ भाजप नगरसेविका नेहल शहा आयोजित रक्तदान शिबिर.
काँग्रेस
- जोगेश्वरी पूर्व विधानसभा काँग्रेस पक्षाच्यावतीने मुंबई महासचिव नितीन सावंत व महासचिव भावना जैन आयोजित रक्तदान शिबिर.
- उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस, दहिसर येथे अभय राजेंद्रप्रसाद चौबे यांच्यावतीने रक्तदान शिबिर.
- काँग्रेस नगरसेविका सुप्रिया सुनील मोरे यांच्या प्रयत्नाने शिवडी येथे तरुण मित्र मंडळ व सर जे.जे. रुगणालयाच्यावतीने रक्तदान शिबिर.
- दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेसच्यावतीने परळ बैलघोडा येथे हुकूम मेहता यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयेाजन.
- चांदिवली साकीनाका येथे चांदिवली काँग्रेस कमिटी, प्रल्हाद भानू शेट्टी युवक प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबिर, १५९ रक्त पिशव्यांचे संकलन.
(हेही वाचाः मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत एप्रिल महिना ठरला ‘विक्रमवीर’! थक्क करणारी आकडेवारी)
शिवसेना
- भांडुप विधानसभेचे आमदार रमेश कोरगावकर यांच्या पुढाकाराने शाखा क्रमांक ११४च्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन, रविवारी २३४ रक्त पिशव्यांचे संकलन.
- विलेपार्ले विधानसभा शाखा क्रमांक ८५च्यावतीने माजी आमदार कृष्णा हेगडे यांच्या पुढाकाराने समर्थवाडी कुंकुवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन, १२८ रक्त पिशव्यांचे संकलन.
- वर्सोवा विधानसभेत शिवसेना नगरसेवक व उपविभाग प्रमुख राजू पेडणेकर यांच्या प्रयत्नाने रक्तदान शिबिराचे आयोजन, एकूण ११८ पिशव्यांचे संकलन.
विविध संस्था
- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्यावतीने भांडुप पूर्व येथे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
- घाटकोपर पूर्व येथे वागड समाजाच्यातवीने रक्तदान शिबिर.
- भांडुपकर रक्तवीर संस्थेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयेाजन, १३६ महिलांनी केले रक्तदान.
Join Our WhatsApp Community