मुंबईमध्ये मांसाहार करणाऱ्यांकडून कोंबड्यांची मागणी अधिक आहे. त्यामुळे कोंबड्या मोठ्या संख्येने विक्रीला आणल्या जातात. परंतु या कोंबड्या वाहनांमधून आणल्या जातात. त्यांची योग्यप्रकारे स्वच्छता राखली जात नसून, या कोंबड्यांच्या वाहनांमुळे परिसरांमध्ये दुर्गंधी पसरते.
त्यामुळे या कोंबड्यांची ने-आण करण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये योग्यप्रकारे स्वच्छता राखण्यासाठी सुनिश्चित धोरण बनवण्यात यावे, अशी मागणी आता भाजपाने केली. प्रशासनाला आता यावर ठोस धोरण बनवून अस्वच्छता राखणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी भाजपाने आयुक्तांना पुन्हा स्मरणपत्र पाठवून केली आहे.
(हेही पहाः आपली मुंबई सुंदर आहे का?)
रोगराईला खतपाणी घालण्याचे काम
मुंबईत विक्रीसाठी कोंबड्या घेऊन येत असलेल्या वाहनांच्या अस्वच्छतेबाबत तसेच दुर्गंधीबाबत भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी २२ ऑक्टोबर २०१८ रोजी तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. जी वाहने कोंबड्या विक्रीसाठी मुंबईत येतात, त्यांची कुठल्याही प्रकारे स्वच्छता चालक तथा मालक राखत नाहीत.
(हेही वाचाः सभागृह नेत्यांच्याच प्रभागात फूटपाथ उखडलेले)
परिणामी कोंबड्यांची विष्ठा वाहनात पडून राहते आणि या दुर्गंधीमुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती उद्भवते. याबाबत आपल्याकडे नागरिकांच्या मौखिक तक्रारी आल्या असून ही वाहने रोगराई पसरण्यास खतपाणी घालत असल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी आहेत, असे गंगाधरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते.
(हेही वाचाः दादरच्या ‘त्या’ तीन रोडच्या फूटपाथकडे दुर्लक्ष का?)
कारवाई करण्याची मागणी
त्यामुळे कोंबड्या वाहून नेणाऱ्या वाहनांमध्ये योग्यप्रकारे स्वच्छता न राखल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. याप्रकारे कारवाई करण्यासाठी महापालिकेच्यावतीने मार्गदर्शक तत्वे तथा नियमावली बनवण्यात यावी, अशीही सूचना निवेदनात केली होती. जर याबाबत नियमावली बनवून संबंधितांवर कारवाई केल्यास अशा वाहनांमध्ये योग्य प्रकारे स्वच्छता राखली जाईल आणि दुर्गंधी पसरण्याचे प्रमाणही कमी होईल, असे देखील गंगाधरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते.
(हेही वाचाः प्रिन्सेस स्ट्रीट, दवा बाजार, लोहार चाळीत चाला पण स्त्यावरुन)
परंतु प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारे हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकाश गंगाधरे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन देत दुर्गंधी पसरवणाऱ्या कोंबड्यांच्या वाहनांवर कारवाई करुन त्यांना त्या वाहनांमध्ये स्वच्छता राखण्याचे निर्देश दिले जावेत, अशी सूचना केली आहे.
(हेही वाचाः दादासाहेब फाळके मार्गाच्या फुटपाथवरुन कसे चालाल?)
Join Our WhatsApp Community