कोकणवासीयांना करता येणार मोफत प्रवास! गणपतीसाठी ३० ऑगस्टला सुटणार ‘भाजप एक्स्प्रेस’

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे या काळात कोकणात जाणाऱ्या बस तसेच रेल्वेगाड्या फुल्ल असतात. रेल्वे गाड्यांचे आरक्षण दोन महिने आधीच सुरू होते. म्हणूनच अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर भाजप नेते निलेश राणे यांनी गणपतीत तळकोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजप एक्सप्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असून, दादर ते कुडाळ या मार्गावर ही ट्रेन धावणार आहे

३० ऑगस्ट रोजी सुटणार भाजप एक्स्प्रेस

भाजपा एक्सप्रेस दादर-कुडाळ मार्गावर नॉनस्टॉप प्रवास करणार आहे. कोकणातील चाकरमान्यांसाठी येत्या गणेशोत्सवासाठी दादर येथून थेट कुडाळ, सिंधुदुर्ग पर्यंत विनामूल्य रेल्वे प्रवास नितेश राणेंनी आयोजित केला असून याकरता भाजपा एक्सप्रेस (दादर- कुडाळ नॉनस्टॉप ) ही विशेष ट्रेन ३० ऑगस्ट रोजी सुटणार आहे.

तरी आपण लवकरात लवकर आपली सीट बुक करा आणि आपल्या गावी उत्साहाने गणेशोत्सव साजरा करा. श्री गणेश आपल्या सर्वांना आणि आपल्या कुटुंबीयांना निरोगी आरोग्य, यश आणि समृद्धी देवो अशी प्रार्थना त्यामुळे तात्काळ आरक्षण करण्याचे आवाहन नितेश राणेंनी केले आहे.

बुकिंगसाठी सकाळी ११:०० ते संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा

संदीप: 9653387922 राजेंद्र: 8928902994 कुत्तदीप: 8928989601

विनामूल्य प्रवास

दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी ही गाडी दादर पूर्व रेल्वे स्टेशनवरून सकाळी १०:३० वाजता सुटेल आणि कुडाळला संध्याकाळी ९:०० वाजता पोहोचेल (सदर ट्रेन मध्ये कुठल्याही स्थानकावर थांबणार नाही)

बुकिंग साठी आपते आधारकार्ड / मतदार ओळखपत्र यापैकी एक आवश्यक आहे. सदर ट्रेन ही फक्त कुडाळ मालवण असल्याने, व्हेरीफिकेशन झाल्यावर आपले बुकिंग नक्की (कन्फर्म) केले जाईल सदर ट्रेन कुठल्याही स्थानकावर थांबणार नाही सदर रेल्वे प्रवास हा सर्व प्रवाशांसाठी विनामूल्य आहे. यासाठी कुठल्याही प्रकारे प्रवासभाडे आकारण्यात येणार नाही, नागरिकांनी याची नोंद घेऊन या रेल्वे प्रवासाचे भाडे देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here