उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील तरुणांचा नोक-यांवरुन होणारा वाद महाराष्ट्रासाठी नवा नाही. आता त्याचाच एक अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण आहे भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेले पत्र. या पत्रात कृपाशंकर सिंह यांनी योगींना उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये मराठी विषय शिकवण्याची विनंती केली आहे.
कृपाशंकर सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशच्या तरुणांना मराठी येत असेल, तर त्यांना मराठीमध्ये सरकारी नोक-या मिळणे सोपे जाईल, म्हणून यूपीमधील शाळांमध्ये मराठी शिकवले जावे. आश्चर्याची बाब म्हणजे ही सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे विचाराधीन असून, ती वाराणसीमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवली जाण्याचाही अंदाज आहे.
( हेही वाचा: Ration Card Cancellation : आता तुमचे रेशन कार्ड होऊ शकते रद्द, हे आहेत नवे नियम )
पत्र लिहिण्यामागचा हेतू
कृपाशंकर सिंह म्हणतात की, मी गेल्या 50 वर्षांपासून मुंबईत राहतोय. माझ्या अनुभवानुसार, जे लोक उत्तर प्रदेशातून स्थलांतरीत होऊन पुढील शिक्षणासाठी मुंबईत येतात, तेव्हा त्यांना महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरी करायची असेल तर अडचणीचा सामना करावा लागणार नाही. या हेतूने कृपाशंकर सिंह यांनी हे पत्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांंना लिहिले आहे. 10 वी आणि 12 वी च्या वर्गांत मराठी विषय असावा, अशी स्पष्ट मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community