मणिपूरमध्ये (Manipur) दि. ६ एप्रिलला भाजपाचे (BJP) अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अस्कर अली (Askar Ali) यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला (Waqf Amendment Bill ) पाठिंबा दिल्याने काही धर्मांध कट्टरपंथींनी त्यांचे घर जाळले आहे. अस्कर यांनी वक्फ सुधारणा कायद्याचे (Waqf Amendment Bill) समर्थन केल्याने त्यांच्यासोबत ही घटना घडली. दि. ५ एप्रिलला रात्री ही घटना थौबल (Thoubal) जिल्ह्यात घडली आहे. अस्कर अली यांच्या निवासस्थानी संतप्त जमावाने घोषणाबाजी करत घराची तोडफोड केली आणि आग लावण्याचा प्रयत्न केला.
( हेही वाचा : Kapil in Captaincy : भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कपिल देवची ‘या’ खेळाडूला पसंती)
समाजमाध्यमावर अस्कर अलीने (Askar Ali) वक्फ विधेयकाचे (Waqf Amendment Bill) समर्थन केले होते. त्यानंतर संतप्त धर्मांधांनी कायदा हातात घेत घर जाळले. घटनेप्रसंगी अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, रात्री ९ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली होती आणि त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आली. ज्यात अस्कर अलीने (Askar Ali) माफी मागितली आहे. इंफाळमधील विविध भागांमध्ये वक्फ सुधारणा विधेयक कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. या रॅलीत पाच हजार लोक उपस्थित होते. निषेधामुळे, लिलाँगमधील राष्ट्रीय महामार्ग १०२ वरील वाहतूक विस्कळीत झाली होती. काही ठिकाणी निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी झाल्या.
दरम्यान याआधी अशीच एक घटना थौबलमधील इरोंग चेसाबात येथे घडली आहे. निदर्शकांनी भाजपाच्या (BJP) नेतृत्वाखाली केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि वक्फ कायद्याचा (Waqf Amendment Bill) निषेध केला आहे. तेथील मुस्लिमबहुल भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि अतिरिक्त सैन्य दलही तैनात करण्यात आले आहेत. मंजूर करण्यात आलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी मंजुरी दिली आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community