दादरमधील रहिवासी इमारतीमध्ये लागलेली भीषण आग नियंत्रणात; मात्र राजकारण तापलं

165

मुंबईतील दादर पूर्वेकडील आरए रहिवाशी इमारतीच्या ४२व्या मजल्यावर गुरुवारी, रात्री साडे आठच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्न करण्यात आले. रात्री बाराच्या सुमारास या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होत. पण ही आग विझली असली तरी या आगीवरून राजकारण तापलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागल्याचा आरोप भाजप आमदार कालिदास कोळंबकरांनी केला आहे.

माहितीनुसार, दादरमधील या रहिवाशी इमारतीच्या ४२व्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. पण ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला ४२व्या मजल्यापर्यंत पाणी आणि इतर आग विझवण्यासाठीचे साहित्य पोहोचवायला खूप प्रयत्न करावे लागले. कालिदास कोलंबकरांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाला घटनास्थळी पाणी घेऊ जाता येत नव्हतं. त्यावेळी सीडीच्या माध्यमातूनही पाणी ४२व्या मजल्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. पण काही झालं नाही. मग इमारतीच्या आतामधून पाणी घटनास्थळापर्यंत पोहोचवण्यात आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना कालिदास कोळंबकर म्हणाले की, ‘हा मुंबई महापालिकेचा निष्काळजीपणा आहे. जर ४४ ते ५५ मजल्यांच्या इमारती बांधायला पालिका परवानगी देत असेल तर अग्निशमन दलाला देखील तशी व्यवस्था करणे गरजेचे आहे.’

(हेही वाचा – तिरूपती अपघातामधील सोलापूरातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.