Nitesh Rane on Aadesh Bandekar : ‘मातोश्री’चा घरगडी गेला; नितेश राणेंची सिद्धिविनायक अध्यक्षपदावरून टीका

Nitesh Rane On Aadesh Bandekar : भाजप आमदार नितेश राणे यांनी सदा सरवणकर यांचे अभिनंदन केले असून आदेश बांदेकर यांच्यावर टीका केली आहे.

216
Nitesh Rane on Aadesh Bandekar : 'मातोश्री'चा घरगडी गेला; नितेश राणेंची सिद्धिविनायक अध्यक्षपदावरून टीका

सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदावरून आता मातोश्रीचा घरगडी गेला आहे, अशी बोचरी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. (Nitesh Rane on Aadesh Bandekar) मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पद यापूर्वी ठाकरे गटाकडे होते. आदेश बांदेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी होते. आमदार सदा सरवणकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नितेश राणे यांनी सरवणकर यांचे अभिनंदन केले असून मावळते अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यावर टीका केली आहे. (Nitesh Rane on Aadesh Bandekar)

(हेही वाचा – World Cup 2023: मॅक्सवेलच्या द्विशतकामुळे ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; 91 धावांत 7 विकेट्स घेऊनही अफगाणिस्तानचा पराभव)

भाजप आमदार नितेश राणे यांनी एक्स (ट्विटर) या माध्यमावर पोस्ट करून बांदेकरांवर टीका केली आहे.

सदा सरवणकरांचं अभिनंदन ! सिद्धिविनायक बप्पाची खरी सेवा तुमच्या हातातून आता होईल हा विश्वास आहे. नाहीतर या अगोदर सिद्धिविनायक बाप्पाची कमी आणि “मातोश्री”ची जास्त सेवा करणारा अध्यक्ष बसवला होता. सामान्य लोकांना दर्शन बंद आणि कोरोना चे सगळे नियम तोडून ‘मातोश्री’च्या लोकांना पाहिजे तेव्हा दर्शन दिले. ‘वर्षा’वर गणपतीसाठी सिद्धिविनायकचे पुजारी जबरदस्ती आणायचे, यादी मोठी आहे. घरगडी गेला, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. (Nitesh Rane on Aadesh Bandekar)

विरोधकांची टीका

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आमदार सदा सरवणकर  यांच्या निवडीवर टीका केली आहे. हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचे लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, पण तसे न करता त्याला बक्षीस देण्यात आले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला होता. याप्रकरणी चौकशीअंती सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती. मात्र त्यामुळे त्यांची मंत्रीपदाची संधी हुकली होती. त्यामुळे आता राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या या न्यासावर नियुक्ती केल्याचे बोलले जात आहे. (Nitesh Rane on Aadesh Bandekar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.