राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शुक्रवारी (५जानेवारी) पुणे येथे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली. त्यांच्या उपस्थितच पुण्याचे भाजपचे आमदार सुनील कांबळे ( (MLA Sunil Kamble)) यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार ससून रुग्णालयात घडला. त्यावेळी ही घटना घडली.त्यांनतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सातव (NCP jitendra Satav) यांना मारहाण केल्याचीही घटना घडली. त्यामुळे यांना नक्की काय झाले आहे अशीच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (MLA Sunil Kamble)
ससून रुग्णालयातील तृतीयपंथीयांच्या वार्डचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर स्थानिक आमदार सुनील कांबळे यांचं नाव नव्हतं. त्यामुळे सुनील कांबळे संतप्त झाले.त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची जबाबदारी असणाऱ्या जितेंद्र सातव यांच्या कानशीलात लगावली. (MLA Sunil Kamble)
(हेही वाचा : Uttar Korea Vs South Korea : उत्तर कोरियाचा दक्षिण कोरिया वर हल्ला; २०० तोफगोळ्यांचा मारा)
पोलिस शिपायाच्याही कानशीलात लगावली
बी. जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्यक्रम संपल्यानंतर आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस शिपायाला कानशिलात लगावली. स्थानिक आमदार असून नाव नसल्याने ते संतप्त झाले होते. तर अशा प्रकारची दुसरी घटना घडली आहे.
काय आहे नेमके प्रकरण
ससून रुग्णालयात उदघाटन कार्यक्रमात पाटीवर नाव नसल्यामुळे आमदार सुनील कांबळे संतप्त झाले. त्यांना राग अनावर झाला. त्याबाबत त्यांनी विचारणा केली त्यावेळी त्यांनी जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जितेंद्र सातव यांना विचारणा केली असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळले. तर याबाबत वरिष्ठांशी चर्चा करतो आणि सांगतो असे त्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community