गरीब, मध्यमवर्गीयांच्या मोफत लसीकरणासाठी भाजपचा ‘हा’ पर्याय

खासगी रुग्णालयांच्या मदतीने एनजीओ झोपडपट्टी व चाळींमध्ये लसीकरण राबवतील. त्यासाठी महापालिकेने या खासगी रुग्णालयांना मोफत लस उपलब्ध करुन द्यावी.

135

मुंबईतील लसीकरणासाठी १३२ खासगी रुग्णालयांमध्ये केंद्र सुरू केली जाणार असून, या केंद्रांमधून शुल्क आकारुन लसीकरण केले जाणार आहे. पण मध्यमवर्गीय आणि गरीबांना हे शुल्क परवडणारे नसून, या सर्व खासगी रुगालयांशी खासगी स्वयंसेवी संस्थांना संलग्न जोडण्यात यावे, जेणेकरुन या एनजीओंच्या माध्यमातून चाळी, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय व गरीबांना मोफत लस देता येईल. यासाठी खासगी रुग्णालयांकडून प्रत्येक लसमागे व्यवस्थापन शुल्क म्हणून जी रक्कम आकारण्यात येते, त्या रक्कमेचा भार एनजीओ उचलून रुग्णालयाला अदा करेल. त्यासाठी महापालिकेने, खासगी रुग्णालयातील केंद्रांना मोफत लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे करत भाजप खासदार मनोज कोटक यांनी मध्यमवर्गीय आणि गरीबांना मोफत लस देण्याचा पर्याय दिला आहे.

मनोज कोटक यांची मागणी

मुंबईतील लसीकरण वाढवण्यासंदर्भात ईशान्य मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेऊन काही सूचनांचे निवेदन दिले. यावेळी त्यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये घोषित केलेली लसीकरण केंद्रे त्वरित सुरू करावी आणि वॉर्डमधील या केंद्रांवर किमान एक हजार लसींचा डोस उपलब्ध करावा. तसेच यासाठी महापालिकेने लसींची खरेदी तातडीने करावी. सर्व खासगी लसीकरण केंद्रे सुरू करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे, याबरोबरच गृहनिर्माण संस्था आणि संकुलात लसीकरण मोहीम राबवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी केली आहे.

IMG 20210506 WA0004

(हेही वाचाः लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नवदाम्पत्य ‘ऑन फिल्ड’)

व्यवस्थापन शुल्काचा भार एनजीओकडे

या संदर्भात कोटक यांनी आपल्याला १३२ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्था आणि संकुलात लसीकरण केले जाणार आहे. खासगी रुग्णालयांकडून लस आणि त्यावरील व्यवस्थापन शुल्क स्वीकारले जाणार आहे. पण खासगी रुग्णालयांशी जर एनजीओंना संलग्न केले, तर व्यवस्थापन शुल्काचा भार एनजीओ स्वीकारायला तयार आहे.

गरीबांना मोफत लस मिळण्यास मदत

खासगी रुग्णालयांच्या मदतीने एनजीओ झोपडपट्टी व चाळींमध्ये लसीकरण राबवतील. त्यासाठी महापालिकेने या खासगी रुग्णालयांना मोफत लस उपलब्ध करुन द्यावी आणि त्यावरील व्यवस्थापन शुल्क एनजीओंच्या माध्यमातून त्या रुग्णालयाला दिले जाईल. जेणेकरुन ज्या मध्यमवर्गीय व गरीबांना पैसे आकारुन लस घ्यावी लागणार आहे, ती या एनजीओंच्या माध्यमातून मोफत दिली जाऊ शकते, अशाप्रकारची सूचना कोटक यांनी केली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आता काय निर्णय घेते यावर सर्व अवलंबून असल्याचे, कोटक यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः झोपडपट्टीत तयार होतात कोरोना टेस्ट किट! एफडीएचा छापा! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.