घाटकोपर, मुलुंडच्या गृहसंकुलातील ७ हजार नागरिकांचे लसीकरण

खासदार मनोज कोटक यांनी ‘संजीवनी आपल्या दारी’ या नाविन्यपूर्ण संकल्पने अंतर्गत ईशान्य मुंबई गृहसंकुलात लसीकरण शिबिरे आयोजित केली आहेत.

मुंबई महापालिका आणि राज्य सरकारकडे पुरेसा लसींचा पुरवठा नसल्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण बंद पडले आहे. अशावेळी या वयोगटाचे लसीकरण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी प्राधान्याने करण्यासाठी खासदार मनोज कोटक यांनी पुढाकार घेतला. ईशान्य मुंबईतील घाटकोपर, मुलुंड आदी भागांतील गृहसंकुलांमध्ये ७ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण पार पडले.

‘संजीवनी आपल्या दारी’ मोहीम

खासदार मनोज कोटक यांच्या संकल्पनेने आणि पाठपुराव्याने मुंबई महापालिकेने डोअर स्टेप व्हॅक्सिनेशनची पॉलिसी बनवली. परंतु पुरेसा लसींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे त्याची अंमलबजावणी होत नव्हती. अशावेळी खासदार मनोज कोटक यांनी रुग्णालयामार्फत गृहसंकुलात लसीकरण मोहीम राबवली. खासदार मनोज कोटक यांनी ‘संजीवनी आपल्या दारी’ या नाविन्यपूर्ण संकल्पने अंतर्गत ईशान्य मुंबई गृहसंकुलात लसीकरण शिबिरे आयोजित केली आहेत. यामुळे लसीकरणापासून वंचित नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे.

(हेही वाचाः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज)

इथे पार पडले लसीकरण

घाटकोपर येथे स्कायलाईन ओयासिस, नीलकंठ किंगडम, पारसधाम, मुलुंड येथे अॅटमॉस्फीअर, विलोस टॉवर, गोल्डन विलोस, रेडवूड/ सिल्व्हर ब्रिच, सीटी ऑफ जॉय या गृहसंकुलात ७ हजार पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण आजपर्यंत पार पडले आहे. फोर्टिस, हिंदु सभा, साई व इतर रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकांमार्फत हे लसीकरण करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त सिएट टायरच्या सर्व कामगारांच्या लसीकरणाचीही मोहीम राबवली आहे.

तरुणांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी योजना 

या शिबिरांमुळे महापालिका मोफत लसीकरण केंद्रांवरील गर्दी व ताण कमी झाल्यामुळे या विभागात समाजातील सर्व स्तरावरील नागरिकांना लसीकरण सहजगत्या उपलब्ध होऊ लागले आहे. संपूर्ण जून महिन्यात ईशान्य मुंबईतील तरुणांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेऊन, विविध गृहसंकुलात दररोज लसीकरण शिबिर आयोजित करण्याची रचना करण्यात आली असल्याचे, मनोज कोटक यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः ‘दि ललित’ पंचतारांकित हॉटेलमधील लसीकरणाची ऐशीतैशी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here