ईशान्य मुंबईतील रुग्णांचे ‘ते’ गोल्डन अवर्स भाजप साधणार! पुरवणार ‘प्राणवायू’

रुग्णालयात दाखल करेपर्यंत जे चार ते पाच तासांचे गोल्डन अवर्स महत्वाचे मानले जातात, ते याद्वारे राखता येऊ शकतात. त्यामुळे रुग्णालयांमध्ये कोणीही अत्यंत चिंताजनक परिस्थितीत जाणार नाही, तसेच काहींना याद्वारे ऑक्सिजन मिळाल्यावरही त्यांची प्रकृती बरी होऊ शकते.

130

ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन  कोविडबाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक बनते आणि मग रुग्णालयात ऑक्सिजन अथवा आयसीयू बेडसाठी नातेवाईकांची धावपळ सुरू होते. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यासाठी जे गोल्डन अवर्स महत्वाचे असतात, तेच अवर्स आता भाजपचे कार्यकर्ते साधरणार आहेत. ईशान्य मुंबईतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या रुग्णालयांमधील गोल्डन अवर्स साधण्यासाठी या संपूर्ण लोकसभा मतदार संघात तब्बल १०० ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटरचे वाटप करण्यात येत आहे. भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी या संपूर्ण विभागात ईशान्य मुंबईतील भाजपच्यावतीने ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर्स उपलब्ध करुन दिले आहेत.

१०० ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटरर्सचे वाटप

मुंबई सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे रुग्णालयांवरील ताणही वाढू लागला आहे. बहुतांशी रुग्ण घरीच उपचार घेत असले, तरी आजही अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णाला दाखल करताना मारामारी होत आहे. मात्र, घरीच उपचार करणाऱ्या रुग्णांचीही प्रकृती कालांतराने ढासळत जाते आणि त्यांना मग रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ सुरू होते. त्यामुळे घरीच उपचार घेताना, रुग्णाचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन ९० पर्यंत आल्यास, त्यांना ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटरच्या माध्यमातून ऑक्सिनचा पुरवठा केल्यावर त्यांच्या शरीराला लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत होऊ शकतो. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण योग्य प्रमाणात आणून, मग त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया करता येऊ शकते. हेच ध्यानात घेत ईशान्य मुंबई भाजपच्यावतीने खासदार मनोज कोटक यांनी १०० ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर्सची खरेदी केली आहे. याचे वाटप ईशान्य मुंबईतील ३८ प्रभागांमध्ये केले जात आहे. ईशान्य मुंबईतील भाजपच्या डॉक्टर्स सेलच्या मदतीने या ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर्सची वैद्यकीय सुविधा रुग्णाला दिली जाणार असल्याचे, खासदार कोटक यांनी स्पष्ट केले.

FB IMG 1619543809550

(हेही वाचाः १ मेपासून तिसऱ्या टप्प्याचे लसीकरण नाही! आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती )

डॉक्टर्स सेलचे नियंत्रण

ईशान्य मुंबईतील भाजपचे नगरसेवक, वॉर्ड अध्यक्ष, कार्यकर्ते यांना हे ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर्स वितरित करण्यात येणार असून, यावर डॉक्टर्स सेलचे नियंत्रण राहणार आहे. ज्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासणार आहे, अशा रुग्णावर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांशी भाजपचे डॉक्टर्स सेलचे प्रतिनिधी चर्चा करुन, रुग्णाच्या अवस्थेविषयी माहिती करुन घेतील आणि त्यानंतरच या ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर्सची सुविधा रुग्णाला दिली जाणार आहे.

गोल्डन अवर्स साधणे सोपे

अत्यंत चिंताजनक असलेल्या रुग्णाला अशाप्रकारे ऑक्सिजन देता येत नाही. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यास, रुग्णालयात दाखल करेपर्यंत ऑक्सिजनचे प्रमाण योग्य प्रकारे राखता येईल, याकरताच ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर्सचा उपयोग संबंधित रुग्णाला होणार आहे. रुग्णालयात दाखल करेपर्यंत जे चार ते पाच तासांचे गोल्डन अवर्स महत्वाचे मानले जातात, ते याद्वारे राखता येऊ शकतात. त्यामुळे रुग्णालयांमध्ये कोणीही अत्यंत चिंताजनक परिस्थितीत जाणार नाही, तसेच काहींना याद्वारे ऑक्सिजन मिळाल्यावरही त्यांची प्रकृती बरी होऊ शकते. याकरता ईशान्य मुंबईत १०० ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटरर्सचे वाटप केले आहे. यामध्ये भाजपच्या नगरसेवकांना प्रत्येकी ५ ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर्स दिले जाणार असून, आणखी पाच कॉन्संन्ट्रेटर्स खरेदी करण्याच्या सूचनाही खासदारांनी दिल्या आहेत.

FB IMG 1619543790425

(हेही वाचाः सरकारी रुग्णालयाचे रेमडेसिवीर जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला दिले! हीना गावितांचा आरोप)

एका बाजूला खासदार निधी वापरण्यास निर्बंध आहेत. मात्र, दुसरीकडे आमदार व नगरसेवक निधी वापरत आहेत. पण अशाप्रकारे ऑक्सिजन कॉन्संन्ट्रेटर्स आमदार व नगरसेवक निधीतून उपलब्ध होणे आवश्यक होते. मात्र, राज्य सरकार व महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. असे असतानाही मनोज कोटक यांनी रुग्णांची काळजी वाहत अशाप्रकारे १०० कॉन्संन्ट्रेटर्सची खरेदी करत विभागात ते उपलब्ध करुन दिल्यामुळे, एकप्रकारे रुग्णांचे जीव वाचवण्यात मदत होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.